Join us

Infosys चा एक निर्णय, ऋषि सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्तींची संपत्ती २०२३ मध्ये १३८ कोटींनी वाढली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 16:11 IST

इन्फोसिस कंपनीने केलेल्या एका घोषणेमुळे अक्षय मूर्तिंना 'लॉटरी' लागली आहे

Akshata Murthy Property: भारतीय आयटी क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसने 2023-24 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे डिव्हिडंड जाहीर केले आहेत. कंपनीने दुसऱ्या तिमाहीत समभागधारकांना प्रति शेअर 18 रूपये या दराने अंतरिम लाभांश जारी केला आहे. इन्फोसिसने जाहीर केले की 25 ऑक्टोबर 2023 ही लाभांशाची रेकॉर्ड तारीख असेल. कंपनीच्या लाभांशाच्या घोषणेनंतर, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांच्या संपत्तीत 2023 मध्ये तब्बल 138 कोटी रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.

शेअरहोल्डर्स पॅटर्ननुसार, ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती या इन्फोसिसमधील मोठ्या प्रमोटर्सपैकी एक आहेत. ऋषी सुनक यांच्याकडे इन्फोसिसचे ३,८९,५७,०९६ शेअर्स आहेत. हा हिस्सा कंपनीचा 1.05 टक्के हिस्सा आहे. अशा परिस्थितीत 18 रुपये प्रति शेअर लाभांशावर त्यांची संपत्ती 70 कोटी रुपयांनी वाढली आहे.

अक्षता मूर्ति यांची संपत्ती 138 कोटीनी कशी वाढली?

2023 च्या पहिल्या तिमाहीत जाहीर झालेल्या निकालांमध्ये प्रति शेअर 17.50 रुपये लाभांश जारी करण्यात आला. 2 जून 2023 रोजी 17.50 रुपयांचा अंतरिम लाभांश जारी केल्यानंतर इन्फोसिसचे शेअर्स एक्स-डिव्हिडंडवर व्यवहार करत होते. या काळात अक्षता मूर्ती यांच्या संपत्तीत 68 कोटींची वाढ झाली होती.

पेआउट कधी होईल?

आता प्रति शेअर 18 रुपये लाभांश जारी करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, अक्षता मूर्तीच्या संपत्तीत 70 कोटी रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे, म्हणजेच 2023 मध्ये संपत्ती 138 कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. 25 ऑक्टोबर ही लाभांशाची नोंदणी तारीख आहे. समभाग धारकांना माहिती देताना इन्फोसिसने सांगितले की, लाभांश 6 नोव्हेंबर रोजी दिला जाईल. अक्षता मूर्ती यांचा इन्फोसिसमध्ये मोठा हिस्सा असल्यामुळे, कंपनी जेव्हा लाभांश जारी करते तेव्हा त्यांची संपत्ती अनेकदा वाढते.

टॅग्स :इन्फोसिसऋषी सुनकइंग्लंडनारायण मूर्ती