InfoBeans Technologies share price today: आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहार दिवशी बुधवारी शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी दिसून आली. या वातावरणात, काही शेअर्सला अपर सर्किट लागल्याचं दिसून आलं. असाच एक स्टॉक म्हणजे इन्फोबीन्स टेक्नॉलॉजीज. या शेअरला बुधवारी कामकाजादरम्यान २० टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. बुधवारी इंट्रा-डे ट्रेडमध्ये या शेअरने ₹५४०.९० या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तर गाठला. बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी देखील ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते.
७ दिवसांत किमतीत ४७ टक्क्यांनी वाढ
गेल्या सात कामकाजाच्या दिवसांत, या स्मॉलकॅप शेअरमध्ये ४७ टक्क्यांची वाढ झाली. या जागतिक आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आधारित सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरच्या किमतीनं २९ ऑगस्ट २०२४ रोजी गाठलेल्या ₹५००.४५ च्या मागील सर्वोच्च पातळीला मागे टाकलं. २९ ऑगस्ट २०२४ रोजी शेअर ₹५७८ या त्याच्या आजवरच्या उच्चांकी स्तराजवळ व्यवहार करत होता.
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी
जून तिमाहीचे निकाल
इन्फोबीन्स टेक्नॉलॉजीजने एप्रिल ते जून २०२५ (आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीत) संपलेल्या तिमाहीत उत्कृष्ट कमाई नोंदवली. या तिमाहीत निव्वळ नफा २०१% वाढून २३.३२ कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी जून तिमाहीत नफा ७.७५ कोटी रुपये होता. या कंपनीच्या विक्रीबद्दल बोलायचं झाले तर, ती १५.३६% ने वाढून १११.८५ कोटी रुपयांवर पोहोचली.
इन्फोबीन्स टेक्नॉलॉजीजच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचं झालं तर, प्रमोटर्सकडे ७४.४४ टक्के हिस्सा आहे. त्याच वेळी, सार्वजनिक हिस्सा २५.५६ टक्के आहे. दिग्गज गुंतवणूकदार मुकुल महावीर अग्रवाल हे देखील सार्वजनिक भागधारकांमध्ये आहेत. मुकुल अग्रवाल यांच्याकडे ४.३८ टक्के हिस्सा आहे, जो १०,६२,३९१ शेअर्सइतका आहे.
कंपनीबद्दल अधिक माहिती
इन्फोबीन्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड बद्दल बोलायचं झालं तर, ही एक आयटी कंपनी आहे जी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि प्रोडक्ट इंजिनिअरिंग सेवा प्रदान करते. कंपनीचं मुख्यालय मध्य प्रदेशातील इंदूर येथे आहे. ही कंपनी युनायटेड स्टेट्स, युरोप आणि मध्य पूर्वेमध्ये जागतिक स्तरावर आपल्या सेवा पुरवते.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)