Join us

'या' शेअरनं वर्षभरात दिला १२००% चा खटाखट परतावा; गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 14:31 IST

Multibagger Small Cap Stock: फेब्रुवारी २०२ मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत १८४ रुपये होती. सोमवारी कंपनीच्या शेअरची किंमत २४३५ रुपयांवर पोहोचली.

Multibagger Small Cap Stock: पारेषण आणि वितरण क्षेत्रानं गेल्या काही वर्षांत चमकदार कामगिरी केली आहे. यामागचे कारण म्हणजे सरकारनं दिलेला निधी आणि जागतिक स्तरावर विजेची वाढती मागणी. या क्षेत्रातील इंडो टेक ट्रान्सफॉर्मर्स (Indo Tech Transformers) या कंपनीनं गेल्या काही वर्षांत चमकदार कामगिरी केली आहे.

१४ महिन्यांपासून सकारात्मक परतावा

फेब्रुवारी २०२ मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत १८४ रुपये होती. सोमवारी कंपनीच्या शेअरची किंमत २४३५ रुपयांवर पोहोचली. आतापर्यंत यात १२०० टक्क्यांहून अधिक वाढ झालीये. सलग १४ महिने इंडो टेक ट्रान्सफॉर्मर्सनं गुंतवणूकदारांना सकारात्मक परतावा दिलाय. एकट्या एप्रिल महिन्यात या शेअरनं ७५ टक्के परतावा दिलाय. जानेवारी २०२४ मध्ये इंडो टेक ट्रान्सफॉर्मर्सच्या शेअरची किंमत २५ टक्क्यांनी वाढली आहे.

गेल्या ४ वर्षांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर या शेअरनं २४१० टक्के परतावा दिलाय. कॅलेंडर वर्ष २०२३ आणि कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये कंपनीच्या शेअर्सनं अनुक्रमे २७५ टक्के आणि ३२६ टक्के परतावा दिलाय. यावर्षी ९ जानेवारीला कंपनीच्या शेअरची किंमत ३७०० रुपयांची पातळी ओलांडून ३७९२ रुपयांच्या पातळीवर पोहोचली होती.

सप्टेंबर तिमाहीत चांगली बातमी

कंपनीच्या दृष्टीकोनातून चांगली बाब म्हणजे अनेक नवीन ऑर्डर्स आल्या आहेत. डिसेंबर महिन्यात कंपनीला १५० एमव्हीए ट्रान्सफरचे १३ युनिट्स पुरवायचे आहेत. ज्याची एकूण किंमत ११७.१७ कोटी रुपये आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल १४६ कोटी रुपये होता. या कालावधीत निव्वळ नफा १८ कोटी रुपये होता.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक