Indo farm equipment limited ipo: २०२४ वर्षातील डिसेंबर महिन्यात भरपूर आयपीओ बाजारात आले. वर्षाच्या अखरेच्या दिवशी आता ट्रॅक्टर निर्मिती क्षेत्रातील कंपनी आयपीओ घेऊन येत आहे. ३१ डिसेंबर रोजी इंडो फार्म इक्विपमेंटचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार असून, याबद्दलच अधिक माहिती जाणून घ्या. (indo farm equipment limited ipo Details)
इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेडचा आयपीओ वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ डिसेंबर खुला होणार आहे. २ जानेवारी २०२५ पर्यंत खुला राहणार आहे. ३० डिसेंबर रोजी अँकर इन्वेस्टर बोली लावू शकणार आहेत. इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेडच्या आयपीओची लिस्टिंग ७ जानेवारी २०२५ रोजी होण्याची शक्यता आहे. एनएसई अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बीएसई म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर हा आयपीओ लिस्ट होणार आहे.
इंडो फार्म इक्विपमेंट प्राइज बँड किती?
Indo farm equipment limited ipo ची प्राइज बँड 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यू (दर्शनी मूल्य)सह प्रति शेअर २०४ ते २१५ रुपयांच्या दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. या आयपीओत १८४.९० कोटी रुपये किंमतीचे ८६ लाख शेअर्स फ्रेश इश्यू आणि ७५.३ कोटी रुपयांचे ३५ लाख ओएफस शेअर्सचा समावेश आहे.
इंडो फार्म इक्विपमेंट आयपीओची लॉट साइज ६९ शेअर्सची आहे. गुंतवणूकदारांना एक लॉटसाठी बोली लावावी लागेल. त्याशिवाय आणखी लॉटसाठीही बोली लावण्याची मूभा आहे. इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेड कंपनीची स्थापना १९९४ मध्ये झालेली आहे.
ही कंपनी ट्रॅक्टर, अवजड वस्तू वाहून नेणाऱ्या क्रेन आणि इतर कटाई करणाऱ्या मशीनची निर्मिती करण्याचे काम करते. कंपनी १६ एचपी ते ११० एचपी शक्तीचे ट्रॅक्टर बनवते.
त्याचबरोबर ९ ते ३० टन वजन वाहून नेण्याची क्षमता असलेले क्रेनही तयार करते. हिमाचल प्रदेशातील बद्दी येथे कंपनीचा प्लांट आहे.
(टीप - येथे केवळ आयपीओबद्दलची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)