Join us
Daily Top 2Weekly Top 5

IndiGo संकटामुळे फक्त 7 दिवसांत 38,000 कोटी रुपये बुडाले; गुंतवणूकदारांनी आता काय करावं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 11:57 IST

IndiGo Crisis : भारतातील आघाडीची विमान कंपनी इंडिगो सध्या गंभीर संकटाचा सामना करत आहे.

IndiGo Crisis Impact: भारतातील आघाडीची विमान कंपनी इंडिगो एअरलाइन्सला सध्या गंभीर संकटाचा सामना करत आहे. या संकटाचा थेट परिणाम शेअर बाजारावर येतोय. इंडिगोची पेरेंट कंपनी असलेल्या इंटरग्लोब एव्हिएशनच्या शेअर्समध्ये गेल्या सात दिवसांत मोठी घसरण झाली आहे. कंपनीचे मार्केट कॅप तब्बल 4.3 अब्ज डॉलर्स, म्हणजेच 38,000 कोटी रुपयांपेक्षा जास्ताने कमी झाले आहे.

इंडिगोचा शेअर लाल निशाणावरच

मंगळवारी शेअर बाजारात मोठी पडझड झाली, ज्याचा परिणाम सेंसेक्स-निफ्टीसह बहुतेक स्टॉक्सवर दिसून आला. इंडिगोच्या शेअरमध्ये आज घसरण थोडी मंदावली असली तरीही शेअर आजही रेड झोनमध्येच आहे. विशेष म्हणजे, सोमवारी या शेअरमध्ये तब्बल 9% ची मोठी घसरण झाली होती. 

सात दिवसांत 17% पेक्षा जास्त घसरण

मीडिया रिपोर्ट्सनुसार, फ्लाइट रद्द होणे, कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि इतर परिचालन अडथळ्यांमुळे इंडिगोच्या शेअरमध्ये गेल्या सात दिवसांत 17% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. यामुळे कंपनीचे बाजारमूल्य 1.89 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले असून, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 38,708 कोटी रुपयांची घट झाली आहे.

इंडिगोच्या उत्पन्नावर मोठा परिणाम

ब्रोकरेज फर्क जेएम फायनान्शिअलच्या मते, हे संकट 15 दिवसांपर्यंत चालू राहिले, तर चालू वित्तीय वर्षात (मार्च 2026 पर्यंत) कंपनीच्या उत्पन्नात 8-9% ची घट होऊ शकते. यात कोणतेही सरकारी दंड किंवा दंडात्मक कारवाई गृहीत धरलेली नाही. रेटिंग एजन्सी मूडीजनेही इंडिगोच्या आर्थिक नुकसानीबाबत चेतावणी दिली आहे.

अनेक ब्रोकरेजचा ‘खरेदी’चा सल्ला 

शेअरमध्ये मोठी पडझड होत असतानाही, जागतिक ब्रोकरेज हाऊसेस इंडिगोबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवत आहेत. UBS ने इंडिगोला Buy रेटिंग दिले असून, टार्गेट प्राइस सुधारून 6,350 रुपये केला आहे. Jefferies नेही Buy रेटिंग कायम ठेवत टार्गेट प्राइस 31% ने वाढवून 7,025 रुपये ठेवले आहे.

(टीप- कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञाची मदत घ्या.)

English
हिंदी सारांश
Web Title : IndiGo Crisis: ₹38,000 Crore Lost in 7 Days; What's Next?

Web Summary : IndiGo faces a crisis, causing a massive ₹38,000 crore market cap drop in just seven days. Flight cancellations and operational issues led to a 17% share price decline. Despite this, some brokerages maintain a positive outlook, advising investors to buy.
टॅग्स :इंडिगोशेअर बाजारस्टॉक मार्केट