Join us

शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 17:03 IST

Share Market Closing Bell Today : मंगळवारी शेअर बाजारातील घसरणीचा कल कायम राहिला. सेन्सेक्स ५८ अंकांनी घसरला. निफ्टी ५० कंपन्यांमध्ये इंडसइंड बँक, अ‍ॅक्सिस बँक, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फायनान्स आणि एसबीआय हे घसरले.

Share Market : भारतीय शेअर बाजारात आज, मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण दिसून आली. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही प्रमुख बेंचमार्क इंडेक्स लाल निशाणीवर बंद झाले. सोमवारी मोठी घसरण झाल्यानंतर, मंगळवारी बीएसई सेन्सेक्स ५७.८७ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ८२,१०२.१० अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे, एनएसईचा निफ्टी ५० इंडेक्सही ३२.८५ अंकांच्या नुकसानीसह २५,१६९.५० अंकांवर स्थिरावला.

सेन्सेक्सच्या ३० पैकी केवळ १२ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या निशाणीवर बंद झाले, तर १७ कंपन्यांचे शेअर्स घसरले. रिलायन्सचा शेअर मात्र कोणताही बदल न होता बंद झाला. निफ्टी ५० मध्येही, ५० पैकी फक्त १९ कंपन्यांचे शेअर्स वाढले, तर बाकी ३१ कंपन्यांना तोटा झाला.

एक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये शानदार तेजीआज सेन्सेक्सच्या कंपन्यांमध्ये एक्सिस बँकच्या शेअर्सनी सर्वाधिक २.३२% ची वाढ नोंदवली. याशिवाय, बजाज फायनान्स १.९४%, मारुती सुझुकी १.८३%, भारतीय स्टेट बँक १.८१%, कोटक महिंद्रा बँक १.५५%, टाटा स्टील १.११% आणि महिंद्रा अँड महिंद्रा ०.८९% वाढीसह बंद झाले.

वाचा - पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट

कोणत्या शेअर्सना झाला तोटा?दुसरीकडे, ट्रेंटच्या शेअर्समध्ये आज सर्वाधिक २.३४% ची घसरण दिसून आली. टेक महिंद्रा २.०७%, हिंदुस्तान युनिलिव्हर १.९४%, अल्ट्राटेक सिमेंट १.९०%, एशियन पेंट्स १.४२% आणि सनफार्मा ०.७८% च्या घसरणीसह बंद झाले. टीसीएस, इन्फोसिस आणि एचसीएल टेकसारख्या प्रमुख आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्येही घट नोंदवली गेली.

टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकनिर्देशांकनिफ्टी