Stock Market : गेल्या काही दिवसांपासून मंदीच्या सावटाखाली असलेल्या भारतीय शेअर बाजाराने सोमवारी दुपारच्या सत्रात अत्यंत नाट्यमय पुनरागमन केले. दुपारपर्यंत सुस्त असलेल्या बाजारात अवघ्या ८ मिनिटांत मोठी खरेदी झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने आपल्या दिवसाच्या नीचांकी पातळीवरून शानदार रिकव्हरी नोंदवत गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला आहे.
८ मिनिटांचे 'ते' नाट्य आणि मोठी झेप
दुपारी २ वाजून १६ मिनिटांनी निफ्टी २३,१३५ च्या पातळीवर चाचपडत होता. मात्र, त्यानंतर अवघ्या ८ मिनिटांत, म्हणजेच २ वाजून २४ मिनिटांनी निफ्टीने थेट २३,३१७ ची पातळी गाठली. ही तेजी इथेच थांबली नाही, तर बाजार बंद होताना निफ्टी २५८ अंकांनी वधारून २३,४०९ वर स्थिरावला. दिवसाच्या नीचांकी स्तरावरून निफ्टीने सुमारे ४०० अंकांची सुधारणा केली. दुसरीकडे, सेन्सेक्स ७५,५०३ वर बंद झाला. सेन्सेक्समध्ये दिवसाच्या नीचांकी पातळीवरून तब्बल १५०० अंकांची ऐतिहासिक रिकव्हरी पाहायला मिळाली. बँक निफ्टीनेही १००० अंकांची सुधारणा करत ५४,४१३ ची पातळी गाठली.
या शेअर्समध्ये राहिली तेजी आणि घसरण
- टॉप गेनर्स : अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासिम आणि हिंडालको या शेअर्समध्ये ५ टक्क्यांपर्यंत तेजी राहिली. कुमार मंगलम बिर्ला यांच्या सकारात्मक विधानांमुळे या शेअर्सला बळ मिळाले. ऑटो क्षेत्रातून महिंद्रा, बजाज ऑटो आणि टीव्हीएस मोटरनेही चांगली कामगिरी केली.
- टॉप लूझर्स : एचएसबीसीने रेटिंग कमी केल्यामुळे HPCL, BPCL आणि IOC या तेल कंपन्यांचे शेअर्स ४ टक्क्यांनी घसरले. निर्गुंतवणुकीच्या चिंतेमुळे IDBI बँक १७ टक्क्यांनी कोसळली.
- विशेष हालचाल: बजेल प्रोजेक्ट्सला दोन मोठे ऑर्डर्स मिळाल्याने शेअरला २० टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले, तर ओला इलेक्ट्रिकने ७ टक्क्यांची झेप घेतली.
बाजार वधारण्यामागे 'हे' जागतिक कारण?
बाजारातील या अचानक आलेल्या तेजीमागे युरोपमधून आलेली एक बातमी महत्त्वाची ठरली. मध्य आशियातील युद्धामुळे होर्मुजची सामुद्रधुनी बंद झाली असून तेल पुरवठा ठप्प झाला आहे. आता हा मार्ग पुन्हा सुरक्षित करण्यासाठी युरोपियन युनियन आपले नौदल मिशन 'Aspides' तिथे तैनात करण्याच्या विचारात आहे. युरोपच्या या धोरणात्मक निर्णयामुळे जागतिक तेल पुरवठा पुन्हा सुरू होईल आणि महागाई कमी होईल, या आशेने बाजारात खरेदीचा ओघ वाढला.
वाचा - गॅस ग्राहकांनो सावधान! केंद्राचे पाच मोठे निर्णय; आता सिलिंडर बुकिंगसाठी मोजावे लागणार ४५ दिवस
चलन बाजार
रुपयामध्येही किरकोळ मजबूती दिसून आली. डॉलरच्या तुलनेत रुपया ४ पैशांनी वधारून ९२.४२ वर बंद झाला.
Web Summary : Indian stock market rebounded dramatically in afternoon trading. Nifty soared in minutes, recovering 400 points from its low. Sensex rallied, gaining 939 points. Gains in UltraTech Cement, Grasim, and Hindalco boosted the market, fueled by potential European intervention to stabilize global oil supply.
Web Summary : भारतीय शेयर बाजार में दोपहर के कारोबार में ज़ोरदार वापसी हुई। निफ्टी मिनटों में उछला, अपने निचले स्तर से 400 अंक ऊपर। सेंसेक्स 939 अंक ऊपर चढ़ा। अल्ट्राटेक सीमेंट, ग्रासिम और हिंडाल्को में लाभ से बाजार को बढ़ावा मिला, जिसे वैश्विक तेल आपूर्ति को स्थिर करने के लिए संभावित यूरोपीय हस्तक्षेप से बढ़ावा मिला।