Join us
Daily Top 2Weekly Top 5

टाटा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले; फक्त एकाच क्षेत्रात वाढ, गुंतवणूकदारांचे ₹४.३० लाख कोटी पाण्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 16:49 IST

Share Market Today: भारतीय शेअर बाजारातील दोन दिवसांची तेजी आज, २१ नोव्हेंबर रोजी थांबली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही सुमारे अर्ध्या टक्क्यांनी घसरून बंद झाले.

Share Market Today : भारतीय शेअर बाजारात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीला आज (२१ नोव्हेंबर) ब्रेक लागला. जागतिक बाजारातून मिळालेल्या नकारात्मक संकेतांमुळे गुंतवणूकदारांमध्ये सावध पवित्रा दिसून आला आणि सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये सुमारे अर्धा टक्का घसरण नोंदवली गेली.

सेन्सेक्स, निफ्टी गडगडलेदिवसअखेर बीएसई सेन्सेक्स ४००.७६ अंकांनी (०.४७%) घसरून ८५,२३१.९२ च्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी-५० इंडेक्स १२४ अंकांनी (०.४७%) कोसळून २६,०६८.१५ च्या पातळीवर स्थिरावला.

इंडिया VIX मध्ये १०% उसळीबाजारातील अस्थिरता आणि भीतीचे प्रमाण मोजणारा इंडिया VIX (India VIX) इंडेक्स आज १० टक्क्यांहून अधिक उसळला आणि १३.३९ वर पोहोचला. इंडिया VIX मध्ये झालेली ही मोठी वाढ बाजारात अनिश्चितता आणि भीती वाढल्याचे स्पष्ट संकेत देते.

जागतिक बाजाराचा नकारात्मक परिणामअमेरिकेच्या बाजारात रातोरात झालेली मोठी घसरण आणि तेथील जॉब डेटामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली. यामुळे वॉल स्ट्रीटवर दबाव वाढला, ज्याचा थेट परिणाम आज भारतीय बाजारावर दिसून आला. 

सर्व प्रमुख सेक्टर्समध्ये घसरणएफएमसीजी वगळता आज बाजारातील जवळपास सर्व सेक्टर्स लाल निशानात बंद झाले. निफ्टी मेटल आणि निफ्टी रिअल्टी इंडेक्समध्ये २ टक्क्यांपर्यंतची सर्वाधिक घसरण झाली. तर आयटी, फार्मा, कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑईल ॲण्ड गॅस आणि हेल्थकेअर इंडेक्सही मोठ्या प्रमाणात घसरले. केवळ एफएमसीजी इंडेक्समध्ये किंचित वाढ झाली, तर ऑटो सेक्टर नाममात्र घसरणीसह सपाट राहिले.

गुंतवणूकदारांचे ४.३० लाख कोटी रुपये बुडालेबाजारातील घसरणीमुळे आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे मोठे नुकसान झाले. बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज ४७२.११ लाख कोटींवर आले, जे काल ४७६.४१ लाख कोटी होते. यामुळे, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे ४.३० लाख कोटी रुपयांची घट झाली.

सेंसेक्समधील प्रमुख शेअर्सची स्थितीआज सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ १३ शेअर्स तेजीत होते. मारुती सुझुकी (१.१७%) मध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. याशिवाय, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, टाटा मोटर्स, आयटीसी आणि एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये ०.५५% ते ०.८०% पर्यंत वाढ झाली.

वाचा - पगार मिळताच अकाउंट होते खाली? '५०-३०-२०' नियमाचा वापर करून ६ महिन्यांत फरक पाहा

सर्वाधिक घसरण झालेल्या शेअर्समध्ये टाटा स्टील (२.५८%) सर्वात वर राहिला. एचसीएल टेक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह आणि भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्समध्येही १.६१% ते २.३३% पर्यंत मोठी घसरण झाली. बीएसईवर एकूण ४,३३८ शेअर्समध्ये व्यवहार झाला, त्यापैकी २,८९७ शेअर्स घसरले, तर केवळ १,२७८ शेअर्समध्ये तेजी दिसली.

English
हिंदी सारांश
Web Title : Tata, Bajaj shares crash; Investors lose ₹4.30 lakh crore.

Web Summary : Indian stock market dips after two days of gains. Sensex and Nifty fell. Investors wealth eroded by ₹4.30 lakh crore. FMCG sector saw marginal gains.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकनिर्देशांकनिफ्टी