Share Market Today : भारतीय शेअर बाजारात बुधवारी जोरदार चढ-उतार पाहायला मिळाले. मात्र, सलग तिसऱ्या दिवशी बाजार 'हिरव्या' निशाणात बंद होण्यात यशस्वी ठरला. सकाळच्या सत्रात विक्रीचा दबाव असतानाही दुपारनंतर बाजारात जबरदस्त पुनरागमन झाले. व्यवहाराच्या अखेरच्या तासात झालेल्या तुफान खरेदीमुळे सेन्सेक्स २८३ अंकांनी वधारून ८३,७३४ वर बंद झाला, तर निफ्टी २५,८१९ च्या पातळीवर स्थिरावला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
गुंतवणूकदारांची 'बंपर' कमाईबाजार वधारल्याने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज मोठी भर पडली आहे. बीएसईवर सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४७०.११ लाख कोटींवरून वाढून ४७१.८९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १.७८ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.
मिडकॅप आणि स्मॉलकॅपची 'चमक' कायमआज मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये अधिक जोम पाहायला मिळाला. दोन्ही निर्देशांक सुमारे ०.५ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. आयटी क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रात खरेदीचा उत्साह होता. मेटल, एफएमसीजी आणि पीएसयू बँका सर्वाधिक १ टक्क्याने वधारल्या. मात्र, आयटी निर्देशांकात १.२ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली.
शेअर्सची चढ-उतारनफा देणारे प्रमुख ५ शेअर्स
- टाटा स्टील : २.९०%
- आयटीसी : २.२१%
- एक्सिस बँक : १.४५%
- रिलायन्स इंडस्ट्रीज : १.३२%
- महिंद्रा अँड महिंद्रा : १.१८%
घसरण झालेले प्रमुख ५ शेअर्स
- टेक महिंद्रा : -१.५८%
- इटर्नल : -१.५६%
- इन्फोसिस : -१.५०%
- अदानी पोर्ट्स : -१.३५%
- एचसीएल टेक : -१.१६%
वाचा - पीएफ खातेदारांसाठी 'गुड न्यूज'! सलग तिसऱ्या वर्षी 'इतके' व्याज मिळण्याची शक्यता, 'या' दिवशी निर्णय
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Indian stock market closes green for the third consecutive day. Sensex rose 283 points to 83,734, Nifty settled at 25,819. Investors earned ₹1.78 lakh crore. Midcap and smallcap shares outperformed. Metal, FMCG, PSU banks gained while IT sector declined.
Web Summary : भारतीय शेयर बाजार लगातार तीसरे दिन हरे निशान में बंद हुआ। सेंसेक्स 283 अंक बढ़कर 83,734 पर, निफ्टी 25,819 पर स्थिर। निवेशकों ने ₹1.78 लाख करोड़ कमाए। मिडकैप और स्मॉलकैप शेयरों का प्रदर्शन बेहतर रहा। मेटल, एफएमसीजी, पीएसयू बैंक बढ़े जबकि आईटी क्षेत्र में गिरावट आई।