Share Market : मध्य आशियातील वाढता तणाव आणि जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारतीय शेअर बाजाराने मंगळवारी आपली दमदार घोडदौड सुरूच ठेवली. सलग दुसऱ्या दिवशी दोन्ही मुख्य निर्देशांकांनी हिरव्या निशाण्यावर बंद होत गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला. सेन्सेक्सने आज ७६,००० चा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला, तर निफ्टीनेही १७२ अंकांची उसळी घेतली.
गुंतवणूकदारांची चांदीमंगळवारी बाजार उघडल्यापासूनच खरेदीचा उत्साह दिसून आला. बीएसईवरील सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४३० लाख कोटी रुपयांवरून वाढून ४३३ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. याचाच अर्थ, केवळ एका दिवसाच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३ लाख कोटी रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे.
निर्देशांकांची आजची कामगिरीसेन्सेक्स : ५६८ अंकांच्या (०.७५%) वाढीसह ७६,०७० वर बंद.निफ्टी ५० : १७२ अंकांच्या (०.७४%) वाढीसह २३,५८१ वर बंद.
टॉप गेनर्स आणि लूजर्सआजच्या सत्रात मेटल आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्सनी बाजाराला सावरले.तेजीतील शेअर्स : इटरनल (५.६८%), टाटा स्टील (४.५५%), महिंद्रा अँड महिंद्रा (३.०६%), एचडीएफसी लाईफ (२.६१%) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स (२.३०%).घसरणीतील शेअर्स : आयटी क्षेत्रातील दिग्गज विप्रोमध्ये १.९५% घसरण झाली. त्याखालोखाल सिप्ला (१.४०%), इन्फोसिस (१.३६%), टाटा कंज्युमर (१.३५%) आणि आयटीसी (१.११%) या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला.सेक्टोरल इंडेक्स : मेटल आणि ऑटोची चांदीआज आयटी सेक्टर वगळता बहुतांश क्षेत्रीय निर्देशांकांनी चांगली कामगिरी केली. विशेषतः संरक्षण आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी रस दाखवला.
वाचा - सिलेंडरमध्ये १४.२ किलो गॅस असण्यामागे 'हे' आहे मोठे सुरक्षा कारण; ९९ टक्के लोकांना माहिती नाहीबाजार वधारण्यामागचे कारण?जागतिक पातळीवर तणाव असूनही, भारतीय अर्थव्यवस्थेची मजबुती आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी दाखवलेला विश्वास यामुळे बाजारात तेजी दिसून येत आहे. युरोपीय युनियनकडून तेल पुरवठा सुरक्षित करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या निर्णयांच्या सकारात्मक संकेतांनीही गुंतवणूकदारांचे मनोबल वाढवले आहे.
Web Summary : Despite global tensions, Indian stock market surges. Sensex crosses 76,000, Nifty rises. Investors gain ₹3 lakh crore led by metal and auto sectors. IT stocks decline.
Web Summary : वैश्विक तनाव के बावजूद, भारतीय शेयर बाजार में उछाल। सेंसेक्स 76,000 के पार, निफ्टी में वृद्धि। धातु और ऑटो क्षेत्र के नेतृत्व में निवेशकों ने ₹3 लाख करोड़ कमाए। आईटी शेयरों में गिरावट।