Join us

बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 17:06 IST

Share Market : आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात, भारतीय शेअर बाजारात जोरदार वाढ दिसून आली.

Share Market : गेल्या आठवड्यातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पहिल्या ट्रेडिंग सत्रात, भारतीय शेअर बाजारात जोरदार वाढ दिसून आली. गेल्या काही दिवसांपासूनच्या घसरणीनंतर सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक चांगल्या वाढीसह बंद झाले, ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही जोरदार खरेदी झाल्याचे दिसून आले.

बाजार कोणत्या पातळीवर बंद झाला?

  • सेन्सेक्स ४१९ अंकांनी वाढून ८१,०१९ वर बंद झाला.
  • निफ्टी १५७ अंकांनी वाढून २४,७२३ वर बंद झाला.
  • निफ्टी बँक ७९५ अंकांनी वाढून ५७,४३२ वर बंद झाला.

वरील आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, बाजारात विक्रीचा दबाव कमी होऊन खरेदीचा जोर वाढला होता.

कोणत्या शेअर्समध्ये 'ॲक्शन' दिसून आली?आज क्षेत्रीय आघाडीवर अनेक शेअर्समध्ये मोठी हालचाल दिसून आली.

  • धातू, रिॲल्टी आणि ऑटो निर्देशांकांमध्ये वाढ झाली. व्याजदरात कपातीची अपेक्षा असल्याने सेल सारख्या धातूच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.
  • जुलै महिन्यातील विक्रीत सुधारणा झाल्यामुळे टू-व्हीलर ऑटो शेअर्समध्ये खरेदी झाली. यात हिरो मोटर्स सर्वात वेगाने वाढणारा शेअर होता.
  • संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्येही चांगली वाढ झाली. बीईएल ३% वाढीसह बंद झाला.
  • खालच्या पातळीवर उघडल्यानंतर, आयटी शेअर्समध्येही चांगली सुधारणा झाली आणि निफ्टी आयटी इंडेक्स २% वाढीसह बंद झाला.
  • आदित्य बिर्ला कॅपिटलचे तिमाही निकाल अपेक्षेप्रमाणे असल्याने शेअर १०% वाढीसह बंद झाला.
  • यूपीएल आणि दिल्लीव्हरी या दोन्ही कंपन्यांनी सकारात्मक टिप्पणी केल्यामुळे ७% वाढीसह बंद झाले.
  • भांडवली बाजारातही तेजी दिसून आली. सीडीएसएल ६% आणि बीएसई ३% वाढीसह बंद झाला. निकालांनंतर, एमसीएक्स देखील ५% वाढीसह हिरव्या रंगात बंद झाला.
  • एथर एनर्जी १६% वाढीसह बंद झाला. मणप्पुरम फायनान्स सारख्या सोने वित्तपुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही ७% वाढ झाली.

वाचा - १७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार

याउलट, पहिल्या तिमाहीत कमकुवत निकालानंतर एबीबी इंडिया ६% घसरून बंद झाला. सीमेन्समध्येही कमकुवतपणा दिसून आला. पीएनबी हाऊसिंग फायनान्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आणि तो ४% घसरून बंद झाला.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूकनिर्देशांकनिफ्टी