Nifty 500 Meltdown : भारतीय शेअर बाजाराने २०२६ या नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत निराशेने केली आहे. जागतिक अनिश्चितता आणि परदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री यामुळे बाजारात घबराटीचे वातावरण आहे. ताज्या आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्याच्या पहिल्या १३ दिवसांत 'निफ्टी ५००' निर्देशांकातील तब्बल ७० टक्के शेअर्स गुंतवणूकदारांना नकारात्मक परतावा देत 'रेड झोन'मध्ये व्यवहार करत आहेत. गेल्या पाच वर्षांतील (२०२० पासून) ही दुसरी सर्वात खराब कामगिरी ठरली आहे.
१. जागतिक बाजाराच्या तुलनेत भारत मागेजानेवारी २०२६ मध्ये भारतीय बाजार जागतिक स्पर्धेत पिछाडीवर पडला आहे. भारतीय शेअर बाजारात निफ्टी ५०० निर्देशांक १.६ टक्क्यांनी, तर निफ्टी ५० निर्देशांक १.५ टक्क्यांनी घसरला आहे. याउलट अमेरिकेचा एस & पी 500 निर्देशांक २ टक्क्यांनी वधारला आहे, तर जपानच्या निक्केईने ६ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली टॅरिफची धमकी, जागतिक व्यापार युद्ध आणि परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची मोठी विक्री यामुळे भारतीय बाजार दबावाखाली आहे."
निफ्टी ५०० ची स्थिती : 'ब्रेड्थ' खालावलीजानेवारी महिन्यात निफ्टी ५०० मधील ३४८ शेअर्स कोसळले आहेत. यात प्रामुख्याने खालील शेअर्सचा समावेश आहे.सर्वात मोठा फटका : गॉडफ्रे फिलिप्स (२०% घसरण).इतर घसरलेले शेअर्स : आयटीसी, एथर एनर्जी, ज्युपिटर वॅगन्स, एनबीसीसी आणि सिग्नेचर ग्लोबल यांसारख्या दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये १३ ते १७ टक्क्यांची घसरण झाली आहे.
धोक्याची घंटा!तांत्रिक चार्टवरही बाजाराची प्रकृती बिघडल्याचे दिसत आहे. निफ्टी ५०० मधील ६०% पेक्षा जास्त (३०२ शेअर्स) कंपन्यांनी आपला २००-दिवसांचा मूव्हिंग एव्हरेज तोडला आहे. तांत्रिक भाषेत याचा अर्थ असा होतो की, हे शेअर्स आता दीर्घकालीन मंदीच्या छायेत आहेत. केवळ ८% शेअर्स सध्या 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये आहेत, म्हणजेच बाजारात अजूनही मोठी सुधारणा होण्याची जागा शिल्लक आहे.
आता अपेक्षा फक्त 'बजेट' आणि 'रिझल्ट्स' कडून!बाजारातील ही मरगळ झटकण्यासाठी आता दोनच गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
- तिसरी तिमाही निकाल : कंपन्यांच्या नफ्यात वाढ झाल्यास गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास परतू शकतो.
- केंद्रीय बजेट २०२६-२७ : अर्थसंकल्पात कॅपेक्स, एमएसएमईसाठी पॅकेज आणि कर सवलती मिळाल्यास बाजारात तेजीची लाट येऊ शकते.
- "बाजारात आता 'बजेट'मुळे विशिष्ट क्षेत्रांमध्ये (उदा. संरक्षण, रेल्वे, ग्रामीण भाग) तेजी येईल. मात्र, संपूर्ण मार्केटमध्ये सुधारणा होण्यासाठी कंपन्यांच्या नफ्यात वाढ होणे अत्यंत गरजेचे आहे.", असा अंदाज बाजार तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
वाचा - IT कंपनीत ५ वर्षे काम, पण पगार वाढण्याऐवजी घटला! जावा डेव्हलपरची 'Reddit' पोस्ट व्हायरल
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Indian stock market faces a downturn. Nifty 500 sees 70% of shares in the red. Global uncertainty and FII selling pressure weigh heavily. Budget and Q3 results offer hope for recovery.
Web Summary : भारतीय शेयर बाजार में गिरावट। निफ्टी 500 के 70% शेयर लाल निशान में। वैश्विक अनिश्चितता और विदेशी निवेशकों की बिकवाली का दबाव। बजट और तीसरी तिमाही के नतीजे सुधार की उम्मीद जगाते हैं।