Join us

फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, NSE नं केला मोठा बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 15:15 IST

शेअर बाजारात फ्युचर्स आणि ऑप्शन सेगमेंटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. एका आकडेवारीनुसार भारतातील एक कोटींहून अधिक ट्रेडर्स एफ अँड ओ ट्रेडिंगमध्ये गुंतलेले आहेत.

शेअर बाजारात फ्युचर्स आणि ऑप्शन सेगमेंटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. एका आकडेवारीनुसार भारतातील एक कोटींहून अधिक ट्रेडर्स एफ अँड ओ ट्रेडिंगमध्ये गुंतलेले आहेत. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजनं फ्युचर्स आणि ऑप्शन ट्रेडिंगच्या कॉन्ट्रॅक्टच्या एक्सपायरी डे मध्ये बदल केलाय.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (एनएसई) ४ एफ अँड ओ कॉन्ट्रॅक्ट्सच्या मासिक एक्सपायरी डे मध्ये बदल करण्याची घोषणा केली. एक्सचेंजने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, चारही एफ अँड ओ कॉन्ट्रॅक्ट्स आता गुरुवारी एक्सपायर होणार आहेत. निफ्टी बँक, फिननिफ्टी, निफ्टी मिडकॅप सिलेक्ट आणि निफ्टी नेक्स्ट ५० हे चार एफ अँड ओ कॉन्ट्रॅक्ट आहेत. हा बदल १ जानेवारी २०२५ पासून लागू होईल, असं एनएसईनं परिपत्रकात म्हटलंय. सेबीच्या निर्देशानुसार विकली एक्सपायरी संपुष्टात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

सध्या निफ्टी बँकेचे मासिक आणि तीन महिन्यांचे कॉन्ट्रॅक्ट महिन्याच्या शेवटच्या बुधवारी (ट्रेडिंग डे) संपत आहेत. फिन निफ्टी, निफ्टी मिडकॅप सिलेक्ट आणि निफ्टी नेक्स्ट ५० कॉन्ट्रॅक्ट अनुक्रमे मंगळवार, सोमवार आणि शुक्रवारी एक्सपायर होतात.

निफ्टी ५० कॉन्ट्रॅक्टच्या एक्सपायरी डेमध्ये (विकली, मंथली, क्वार्टरली आणि हाफ इयरली) कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असं एनएसईनं म्हटलंय. निफ्टी ५० चे कॉन्ट्रॅक्ट गुरुवारी संपत आहेत, जे सुरूच राहतील.

काय म्हटलं एनएससीनं?

'निफ्टीच्या मासिक, साप्ताहिक, तीन महिने आणि सहामाही कॉन्ट्रॅक्टच्या एक्सपायरी डेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हा बदल १ जानेवारी २०२५ च्या ईओडीपासून लागू होईल, म्हणजेच सर्व विद्यमान कॉन्ट्रॅक्स्टचा एक्सपायरी डे नवीन एक्सपायरी डे म्हणून १ जानेवारी २०२५ (ईओडी) पर्यंत सुधारित केली जाईल, असं एनएसईनं म्हटलंय.

आठवड्याच्या सुरुवातीलाच बीएसईनं सेन्सेक्स, बँकेक्स आणि सेन्सेक्स ५० कॉन्ट्रॅक्ट्सच्या मंथली एक्सपायरी डेमध्ये बदल करण्याची घोषणा केली. हा बदल १ जानेवारी २०२५ पासून लागू होणार आहे. सेन्सेक्सची विकली कॉन्ट्रॅक्ट्सही शुक्रवारच्या मुदतीऐवजी मंगळवारी संपणार आहेत.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक