Join us

'या' Penny Stocks वर लक्ष ठेवाल तर व्हाल मालामाल, बाजार घसरतानाही लागलंय अपर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 14:31 IST

बाजारात घसरण दिसत असतानाही काही शेअर्सनं चांगली कामगिरी केली आहे.

शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवलंय आणि असेही काही शेअर्स आहेत ज्यात गुंतवणूकदारांचे पैसेही बुडालेत. त्यामुळे गुंतवणूक करताना अभ्यासपूर्वक गुंतवणूक करणं गरजेचं आहे. शुक्रवारी कामकाजादरम्यान बीएसई सेन्सेक्स 450 अंकांची घसरण तर निफ्टीमध्ये 139 अंकांनी घसरण दिसून आली होती. 

शेअर बाजारातील दुपारच्या व्यवहारात सर्व सेक्टरल निर्देशांकात घसरण दिसून येत होती.  टायटन, महिंद्रा अँड महिंद्रा, एसबीआय लाइफ आणि टीसीएस या कंपन्यांचा शेअर्समध्ये वाढ दिसून आली. तर अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड, इंडसइंड बँक आणि बजाज फायनान्स कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली होती.

शुक्रवारी कामकाजादरम्यान अनेक पेनी स्टॉक्सला अपर सर्किट लागलं होतं. याचा अर्थ शेअर बाजारात घसरण झाली असतानाही हे शेअर्स चांगली कामगिरी करत होते. यामध्ये सुमित इंडस्ट्रीज लिमिटेड, सनगोल्ड कॅपिटल, अमित इंटरनॅशनल, जेडी ऑर्गोकेम, कॉन्स्ट्रोनिक्स इन्फ्रा, पार्कर अॅग्रोकेम, लॉर्ड ईश्वर हॉटेल्स, व्हिन्ट्रॉन इन्फॉर्मेटिक्स, सर्व्होटेक इंडस्ट्रीज आणि सीकोस्ट शिपिंग सर्व्हिसेस या कंपन्यांचा समावेश होता.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक