NSDL share price: नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीच्या (NSDL) शेअर्समध्ये प्रचंड खरेदी दिसून येत आहे. कंपनीच्या शेअरनं आज २०% च्या अपर सर्किटला धडक मारली आणि दिवसाच्या इंट्राडे उच्चांकी दर ११२३.२० रुपयांवर पोहोचला. कंपनीचे शेअर्स बुधवारीच लिस्ट झाले होते. NSDL चा IPO शेअर्स बुधवार, ५ ऑगस्ट रोजी BSE वर १०% प्रीमियमसह ₹८८० वर लिस्ट झाला आणि ₹८०० च्या IPO किमतीपेक्षा १७% जास्त दरानं वाढून बंद झाले. आज, फक्त दोन दिवसांत, IPO गुंतवणूकदारांना ३५% चा उत्तम परतावा देखील मिळाला.
आजच्या ट्रेडिंग सत्रात, NSDL चा शेअर ₹९३४.९५ वर उघडला, जो त्याच्या मागील बंद ₹ ९३६ पेक्षा थोडा कमी होता. दरम्यान, काही वेळातच त्यात तेजी दिसून आली आणि शेअर ११२३.२० रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला.
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
NSDL चा IPO १ ऑगस्ट २०२५ रोजी बोलीसाठी खुला होता आणि तो ४ ऑगस्टपर्यंत खुला होता. NSDL च्या आयपीओची एकूण साईज ४०११.६० कोटी रुपयांपर्यंत आहे. एनएसडीएलचा आयपीओ एकूण ४१.०२ पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओला किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीत ७.७६ पट सबस्क्रिप्शन मिळालं. त्याच वेळी, कर्मचारी श्रेणीत १५.३९ पट बोली लावण्यात आल्या. एनएसडीएल आयपीओला गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार (एनआयआय) श्रेणीत ३४.९८ पट सबस्क्राइब मिळाला आहे. त्याच वेळी, पात्र संस्थात्मक खरेदीदार श्रेणीला १०३.९७ पट सबस्क्रिप्शन मिळालं.
एनएसडीएल आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार किमान १ लॉट आणि जास्तीत जास्त १३ लॉटसाठी बेट्स लावू शकणार होते. आयपीओच्या एका लॉटमध्ये १८ शेअर्स आहेत. म्हणजेच, किरकोळ गुंतवणूकदारांना १ लॉटसाठी १४,४०० रुपये गुंतवावे लागले. एनएसडीएल आयपीओमध्ये एकूण ५,०१,४५,००१ शेअर्स ऑफर करण्यात आले होते. शेअरची फेस व्हॅल्यू २ रुपये आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)