Join us
Daily Top 2Weekly Top 5

५९० कोटींच्या 'झोल'मुळे IDFC First Bank चे शेअर्स धडाम! सरकारी खात्यातूनच पैशांची पळवापळवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 13:40 IST

IDFC First Bank Share Price: सोमवारी आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली. स्टॉक २०% पर्यंत घसरले.

IDFC First Bank : शेअर बाजारात सोमवारी सकाळी उत्साहाचे वातावरण असतानाच आयडीएफसी फर्स्ट बँकच्या गुंतवणूकदारांना मात्र मोठा हादरा बसला आहे. बँकेच्या चंदीगड शाखेतील ५९० कोटी रुपयांच्या महाघोटाळ्याचे वृत्त समोर येताच, सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात बँकेचे शेअर्स २० टक्क्यांच्या लोअर सर्किटवर धडकले. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर हा शेअर ७५.१६ रुपयांवर उघडला होता. मात्र, प्रचंड विक्रीच्या दबावामुळे काही वेळातच तो ६६.८० रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.

५९० कोटींचा 'झोल' कसा झाला?हरियाणा सरकारच्या एका विभागाने आपले खाते बंद करून सर्व रक्कम दुसऱ्या बँकेत वळवण्याची विनंती केली होती. मात्र, जेव्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी केली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. सरकारी रेकॉर्डनुसार खात्यात असणारी रक्कम आणि बँकेच्या सिस्टीममधील बॅलन्स यामध्ये मोठी तफावत आढळली. हा घोटाळा कोणत्याही बाह्य हॅकरने केला नसून, बँकेच्याच कर्मचाऱ्यांनी संगनमताने सरकारी निधीचा अपहार केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. बँकेने एक्स्चेंज फायलिंगमध्ये मान्य केले आहे की, सुमारे ५९० कोटी रुपयांच्या निधीचा मेळ लागत नाहीये.

हरियाणा सरकारचा 'सर्जिकल स्ट्राईक'घोटाळा उघड होताच हरियाणा सरकारने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. वित्त विभागाने तातडीने परिपत्रक काढून IDFC First Bank आणि AU Small Finance Bank या दोन्ही बँकांना सरकारी कामातून बाहेर केले आहे. सर्व सरकारी विभाग, बोर्ड आणि महामंडळांना या दोन्ही बँकांमधील आपली खाती त्वरित बंद करून सर्व रक्कम दुसऱ्या बँकांमध्ये हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फिक्स्ड डिपॉझिटचे नियम मोडून जास्त व्याजाचा निधी बचत खात्यात ठेवल्याचा आरोपही सरकारने केला आहे, ज्यामुळे सरकारी तिजोरीचे नुकसान झाले.

वाचा - टोल नाक्यांना 'रामराम'! १ एप्रिलपासून मोठे बदल; पण 'जीपीएस' टोलमुळे तुमची प्रायव्हसी धोक्यात?

बँकेचे स्पष्टीकरण आणि कारवाईबँकेने आपली प्रतिमा सावरण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. चार संशयित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गैरव्यवहार केवळ चंदीगड शाखेतील ठराविक सरकारी खात्यांपुरताच मर्यादित असून, सर्वसामान्य ग्राहकांच्या पैशांवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही, असा दावा बँकेने केला आहे. प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी स्वतंत्र बाह्य यंत्रणेमार्फत 'फॉरेन्सिक ऑडिट' करण्याची तयारी बँकेने सुरू केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : IDFC First Bank Shares Plunge Amid ₹590 Crore Fraud Allegations

Web Summary : IDFC First Bank shares crashed after a ₹590 crore fraud surfaced in its Chandigarh branch. Haryana government accounts were targeted, leading to fund diversions. The government has ordered closure of accounts and suspended officials, initiating a forensic audit.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूक