Hindustan Copper Share Price : गेल्या वर्षभरापासून शेअर बाजार सुस्तावला असला तरी काही कंपन्यांनी कमाल केली आहे. अशाच एका सरकारी कंपनीच्या शेअरने १ महिन्यात गुंतवणूकदारांना मालामाल केली आहे. हिंदुस्तान कॉपरच्या गुंतवणूकदारांसाठी सप्टेंबर महिना अत्यंत फायदेशीर ठरला आहे. तांब्याच्या उत्पादनातील भारतातील एकमेव सरकारी कंपनी असलेल्या या शेअरने गेल्या काही दिवसांत शेअर बाजारात दमदार कामगिरी केली आहे. या एकाच महिन्यात ४० टक्क्यांहून अधिक परतावा दिला असून, गुरुवारीही हा शेअर ७ टक्क्यांनी वाढून ३३०.४० रुपयांच्या पातळीवर पोहोचला.
तेजीचे मुख्य कारण : जागतिक पुरवठा साखळीत अडथळाहिंदुस्तान कॉपरच्या शेअर्समध्ये अचानक आलेल्या या उसळीमागे अनेक मजबूत कारणे आहेत.
- जागतिक किमतीत वाढ: सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे तांब्याच्या आंतरराष्ट्रीय किमतीत झालेली मोठी वाढ. लंडन मेटल एक्सचेंजवर तांब्याच्या किमती १५ महिन्यांच्या उच्चांकावर म्हणजेच सुमारे १०,४०० डॉलर प्रति मेट्रिक टन पर्यंत पोहोचल्या आहेत.
- पुरवठा खंडित: या दरवाढीचे मुख्य कारण इंडोनेशियातील ग्रासबर्ग खाणीत झालेला मोठा अपघात आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या तांब्याच्या या खाणीतून पुरवठा अचानक थांबल्यामुळे तांब्याच्या जागतिक पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला.
- वाढती मागणी: इलेक्ट्रॉनिक्स, रिन्यूएबल एनर्जी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या क्षेत्रांमध्ये तांब्याची मागणी सातत्याने वाढत आहे. पुरवठ्यातील अडथळ्यामुळे मागणी कायम राहिली आणि त्यामुळे किमती गगनाला भिडल्या.
हिंदुस्तान कॉपरला दुहेरी फायदाहिंदुस्तान कॉपर ही भारतात तांब्याच्या उत्पादनाची संपूर्ण प्रक्रिया (खाणकाम ते रिफायनिंग) करणारी एकमेव कंपनी आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तांबे महाग झाल्यावर, त्याचा थेट फायदा कंपनीला मिळतो आणि कंपनीचा महसूल आणि नफा दोन्ही वाढतो.
उत्पादन क्षमता वाढणार: कंपनीला नुकताच झारखंडमधील राखा कॉपर खाणीसाठी पुढील २० वर्षांसाठी खाण भाडेपट्ट्याचे नूतनीकरण मिळाले आहे. यामुळे कंपनी पुन्हा या खाणीतून उत्पादन सुरू करू शकेल, ज्यामुळे तिची उत्पादन क्षमता आणि महसूल आणखी वाढेल.ऑइल इंडियासोबत करार: कंपनीने नुकताच ऑइल इंडियासोबत एक करार केला आहे, ज्याअंतर्गत दोन्ही कंपन्या तांबे आणि इतर महत्त्वाच्या खनिजांच्या शोध आणि विकासासाठी एकत्र काम करतील.
वाचा - निवृत्तीनंतर पेन्शनची चिंता सोडा! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा मिळेल २०,५०० रुपये
गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, जर ही गती महिनाअखेरपर्यंत कायम राहिली, तर डिसेंबर २०२३ नंतरचा हा सर्वात मोठा मासिक परतावा ठरू शकतो. गुंतवणूकदारांसाठी हे सकारात्मक संकेत असून, कंपनीच्या भविष्यातील वाढीसाठी हे करार आणि खाण परवान्याचे नूतनीकरण महत्त्वाचे ठरू शकतात.
Web Summary : Hindustan Copper shares surged 40% in a month due to rising global copper prices, supply disruptions from Indonesia's Grasberg mine, and increasing demand from various sectors. Renewed mining leases and agreements further boost the company's growth potential.
Web Summary : वैश्विक तांबे की कीमतों में वृद्धि, इंडोनेशिया की ग्रासबर्ग खदान से आपूर्ति व्यवधान और विभिन्न क्षेत्रों से बढ़ती मांग के कारण हिंदुस्तान कॉपर के शेयरों में एक महीने में 40% की वृद्धि हुई। नवीनीकृत खनन पट्टों और समझौतों से कंपनी की विकास क्षमता और बढ़ेगी।