Hero MotoCorp Dividend: देशातील आघाडीची टू-व्हिलर उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने मंगळवारी आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. यासह कंपनीने आपल्या भागधारकांसाठी प्रति शेअर तब्बल ७५ रुपयांच्या अंतिम डिव्हिडंड देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
चौथ्या तिमाहीत नफ्यात २६ टक्क्यांची वाढ
Hero MotoCorp ने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा २६ टक्क्यांनी वाढून १,४७३.९२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्षातील याच तिमाहीत कंपनीचा नफा १,१६८.७५ कोटी रुपये होता. तसेच कंपनीचे ऑपरेशनल उत्पन्नही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
चालू तिमाहीतील उत्पन्न : १२,९७८.२८ कोटी रुपयेमागील वर्षातील याच तिमाहीतील उत्पन्न : ९,९६९.८१ कोटी रुपये
कंपनीच्या दुचाकी विक्रीतही मोठी वाढ नोंदवली गेली आहे. समीक्षाधीन तिमाहीत Hero MotoCorp ने १७.१४ लाख युनिट्सची विक्री केली, जी मागील वर्षाच्या तुलनेत २४ टक्के अधिक आहे.
कंपनीचा एकूण खर्चात वाढ
चालू तिमाहीतील खर्च : ११,२९५.५३ कोटी रुपयेमागील वर्षातील खर्च : ८,७५०.१३ कोटी रुपये
पवन मुंजाल यांची पुन्हा नियुक्ती
कंपनीच्या संचालक मंडळाने पवन मुंजाल यांची १ ऑक्टोबर २०२६ पासून पुढील पाच वर्षांसाठी एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून पुनर्नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे. ही नियुक्ती कंपनीच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) भागधारकांच्या मंजुरीनंतर अंतिम होणार आहे.
प्रति शेअर ७५ रुपयांचा डिव्हिडंड
कंपनीने २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक शेअरवर ७५ रुपयांचा अंतिम डिव्हिडंड जाहीर केला आहे. मात्र, यासाठी भागधारकांची मंजुरी आवश्यक राहणार आहे. डिव्हिडंडसाठी कंपनीने २४ जुलै ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. याचा अर्थ २४ जुलैनंतर खरेदी केलेल्या शेअर्सवर गुंतवणूकदारांना या डिव्हिडंडचा लाभ मिळणार नाही. AGM मध्ये मंजुरी मिळाल्यानंतर ३० दिवसांच्या आत डिव्हिडंडची रक्कम भागधारकांच्या खात्यात जमा केली जाईल.
(टीप - हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Hero MotoCorp declared a ₹75 dividend per share following a 26% profit increase in Q4. Revenue rose significantly, driven by strong two-wheeler sales. Pawan Munjal's reappointment as Executive Chairman awaits shareholder approval. Dividend eligibility requires share purchase before July 24.
Web Summary : हीरो मोटोकॉर्प ने चौथी तिमाही में 26% लाभ वृद्धि के बाद ₹75 प्रति शेयर लाभांश घोषित किया। दोपहिया वाहनों की बिक्री से राजस्व में वृद्धि हुई। पवन मुंजाल की कार्यकारी अध्यक्ष के रूप में पुनर्नियुक्ति शेयरधारक की मंजूरी का इंतजार कर रही है। 24 जुलाई से पहले शेयर खरीदने पर लाभांश मिलेगा।