Join us

HMPV रुग्ण आढळल्यानंतर शेअर बाजारात भूकंप; पण हेल्थकेअर स्टॉक्स झाले रॉकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 15:58 IST

HMPV Case In India: भारतात एचएमपीव्ही प्रकरण उघडकीस आल्यानंतर शेअर बाजाराला धक्का बसला आहे. परंतु, अशा परिस्थितीत हेल्थकेअर स्टॉकची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहेत.

Healthcare Stocks : भारतात HMPV प्रकरण आढळल्यानंतर शेअर बाजारात भूकंप आला आहे. BSE सेन्सेक्स १३२३ अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निफ्टी ४१३ अंकांच्या घसरणीसह खाली आला आहे. शेअर बाजारात पुन्हा एकदा कोरोना महामारी सारखी परिस्थिती निर्माण होत असल्याची चिन्ह आहेत. एकीकडे दिग्गज क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स धडाधड आपटत आहेत. तर दुसरीकडे अशा परिस्थितीत आरोग्य सेक्टरचे शेअर्स रॉकेटसारखे वर जात आहेत.

हॉस्पिटल आणि डायग्नोस्टिक्समध्ये उसळीकोरोना महामारीच्या (कोविड १९ महामारी) काळातही या क्षेत्रातील हॉस्पिटल आणि डायग्नोस्टिक कंपन्यांच्या स्टॉकमध्ये जोरदार वाढ झाली होती. आजच्या सत्रात एचएमपीव्ही प्रकरण समोर आल्यानंतर आरोग्य सेवा समभागांमध्येही अशीच स्थिती दिसून येत आहे. निफ्टीच्या हेल्थकेअर इंडेक्समध्ये समाविष्ट असलेला मेट्रोपोलिसचा शेअर १.६८ टक्क्यांच्या वाढीसह २०३१ रुपयांवर व्यवहार करत आहे. याशिवाय डॉ. लाल पॅथलॅबचा शेअरही १.२३ टक्क्यांनी वाढला असून शेअर २९८१ रुपयांवर व्यवहार करत आहे. अपोलो हॉस्पिटलच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली असून अपोलो हॉस्पिटलचा शेअर १.१२ टक्क्यांच्या वाढीसह ७३७९ रुपयांवर व्यवहार करत आहे. ग्रॅन्युल्स इंडियाचे शेअर्स १.०६ टक्क्यांच्या वाढीसह ६११.६० रुपयांवर आणि सिंजीन इंटरनॅशनलचे शेअर्स ०.२१ टक्क्यांच्या वाढीसह ८५८.६५ रुपयांवर व्यवहार करत आहेत.

आरोग्य सेवा क्षेत्रातील शेअर्समध्ये 14 टक्क्यांपर्यंत वाढथायरोकेअरचे शेअर १३.६५ टक्क्यांच्या उसळीसह १०३८ रुपयांवर आहेत, याशिवाय एस्टर डीएम हेल्थकेअरचे शेअर्समध्ये ०.७५ टक्क्यांची वाढ होऊन ५२५.३५ रुपयांवर पोहचले, कॉन्कॉर्ड बायोटेकचे शेअर्सने २.१८ टक्क्यां झेप घेतली, ते २१३३.५० रुपयांवर आहेत, नारायणा हृदयालायामध्ये १.०७ टक्के वाढून १३२४ रुपये आणि विजया डायग्नोस्टिक ०.७१ टक्क्यांच्या वाढीसह  ११९ रुपयांवर व्यवहार करत आहे. क्रॅस्ना डायग्नोस्टिकचे शेअर्स देखील २.७० टक्क्यांच्या वाढीसह ९२७.१० रुपयांवर व्यवहार करत आहेत.

HMPV विषाणूमुळे चमकले डायग्नोस्टिक स्टॉक्सचीनमधून उद्भवलेला एचएमपीव्ही विषाणू जर कोरोनाप्रमाणे देशात पसरला तर सरकार त्याच्या तपासाची व्याप्ती वाढवू शकते, याचा निदान कंपन्यांना मोठा फायदा होऊ शकतो, असे बाजारातील तज्ज्ञांना वाटते.

टॅग्स :शेअर बाजारनिर्देशांकनिफ्टीशेअर बाजार