Join us  

HDFC बँकेनं बुडवली शेअर बाजाराची नौका, बुधवारी १ लाख कोटींचं नुकसान; आजही घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 12:32 PM

बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली. बीएसई सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद झाले.

बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली. बीएसई सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद झाले. मंगळवारी संध्याकाळी एचडीएफसी बँकेचे निकाल आल्यानंतर बुधवारी सकाळी शेअर बाजारात घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र एवढी मोठी घसरण कुणालाही अपेक्षित नव्हती. 

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या विधानाने या आगीत आणखीन तेल ओतण्याचं काम केलं. एचडीएफसी बँकेच्या शेअर्सचा निफ्टी ५० मध्ये १३.५ टक्के हिस्सा आहे. एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरणीमुळे निफ्टीमध्येही घसरण दिसून आली. ब्लूचिपमध्ये गुंतवणूकदारांना १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकचं नुकसान झालं, कारण हेविवेट शेअर्सचं मार्केट कॅप घसरुन ११.६७ लाख कोटी रुपये झालं.

मोठ्या प्रमाणात शेअर्सची विक्री

बुधवारी विदेशी गुंतवणूकदारांना १०,४०० कोटी रुपयांचे शेअर्स विकले आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ४ कोटी हजार रुपयांचे शेअर्स खरेदी करेले. गुरुवारच्या सुरुवातीच्या कामकाजाबद्दल सांगायचं झालं तर एचडीएफसीच्या शेअर्समध्ये आणखी घसरण दिसून आली आणि तो १४८५ रुपयांच्या स्तरावर पोहोचला होता.

दोन दिवसांत मोठी घसरण

बुधवारी एचडीएफसी बँकेचा शेअर १५३७ रुपयांच्या पातळीवर बंद झाला. जर आपण मंगळवारी संध्याकाळबद्दल बोललो तर एचडीएफसी बँकेचे शेअर्स १६७८ रुपयांच्या पातळीवर बंद झाले होते. अवघ्या दोन दिवसांत एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये सुमारे २०० रुपयांची घसरण झाली आहे. एचडीएफसी बँकेच्या अपेक्षेपेक्षा कमकुवत निकालानंतर शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवली जात आहे. एचडीएफसी बँकेचे नेट इंटरेस्ट मार्जिन ३.४ टक्क्यांच्या इतिहासातील सर्वात खालच्या पातळीवर आहे.

टॅग्स :एचडीएफसीशेअर बाजार