Join us
Daily Top 2Weekly Top 5

९४% रिटर्न दिल्यावर 'ग्रोव'ला १०% लोअर सर्किट! गुंतवणूकदारांनी शेअर विकायला का लावली रांग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 14:25 IST

Groww Share Price : गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये ग्रोवचे शेअर्स शेअर बाजारात तेजीत होते. पण, आज ग्रोवचे शेअर्स अचानक उलटले आणि १० टक्क्यांनी घसरले.

Groww Share Price : डिजिटल ब्रोकिंग प्लॅटफॉर्म ग्रोवची मूळ कंपनी बिलियनब्रेन्स गॅरेज व्हेंचर्सच्या शेअर्समध्ये लिस्टिंगनंतर सुरू असलेली तुफानी तेजी आज अचानक थांबली. इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये ग्रोवचा शेअर १० टक्क्यांच्या लोअर सर्किटसह १६९.८९ रुपयांवर आला. १२ नोव्हेंबर रोजी लिस्ट झाल्यानंतर, ग्रोवच्या शेअरने केवळ पाच व्यावसायिक सत्रांमध्ये आपल्या आयपीओ किमतीपेक्षा ९४ टक्के उसळी घेतली होती. मंगळवारी (१७ नोव्हेंबर) १९३.९१ रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र, आज गुंतवणूकदारांनी जोरदार नफावसुली सुरू केल्याने शेअरने मोठी घसरण अनुभवली.

एवढी घसरण का झाली?ग्रोवचा शेअर बीएसईवर १४% प्रीमियमसह ११४ रुपयांवर लिस्ट झाला होता. लिस्टिंगनंतर डिजिटल ब्रोकिंग प्लॅटफॉर्मचा वाढता ग्राहकवर्ग, महसुलातील वाढ आणि फिनटेक क्षेत्राची उच्च वाढ क्षमता यामुळे हा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठरला. मात्र, आता मार्केट ॲनालिस्ट्स या घसरणीला 'तंत्रिकदृष्ट्या आरोग्यपूर्ण सुधारणा' मानत आहेत.

अहवालानुसार, बाजारातील विश्लेषकांचे म्हणणे आहे की, ग्रोवचे मूल्यांकन आता मोतीलाल ओसवाल, एंजल वन यांसारख्या जुन्या आणि स्थापित ब्रोकिंग दिग्गजांपेक्षाही खूप वर पोहोचले आहे. आयपीओच्या वेळी ग्रोवचा P/E रेशो सुमारे ३३-३७x होता, पण तेजीमुळे तो आता ६१x वर पोहोचला आहे. यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी नफा सुरक्षित करण्यासाठी विक्रीचा मार्ग पत्करला. ग्रोवचे बाजार भांडवल १ लाख कोटींचा आकडा पार करून अनेक जुन्या कंपन्यांच्या पुढे गेले आहे. हे मूल्यांकन डिजिटल स्केल आणि भविष्यातील उत्पादन विकासाच्या संभाव्यतेवर आधारित आहे.

आता शेअर विकावा की ठेवावा? तज्ज्ञांचे मतस्वस्तिका इन्व्हेस्टमार्टच्या शिवानी न्याती यांनी सांगितले की, उच्च मूल्यांकन, मार्जिनवरील दबाव आणि फिनटेक क्षेत्रातील नियामक धोक्यांमुळे अनेक गुंतवणूकदार सतर्क झाले आहेत. आयपीओ मिळालेल्या गुंतवणूकदारांनी आंशिक नफा बुक करून आपले लाभ सुरक्षित करावेत.

स्टॉपलॉससह होल्ड कराज्या गुंतवणूकदारांकडे अजूनही शेअर आहेत, त्यांनी मध्यम आणि दीर्घ कालावधीसाठी ते ठेवू शकतात. मात्र, त्यांनी ८० रुपयांचा स्टॉपलॉस ठेवून सावधगिरी बाळगावी.

'खरेदी करा' संधीमेहता इक्विटीजचे प्रशांत तापसे यांच्या मते, ज्या गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये शेअर्स मिळाले नाहीत, त्यांच्यासाठी ही घसरण 'बाय ऑन डिप्स्' धोरण वापरून पोर्टफोलिओमध्ये स्टॉक समाविष्ट करण्याची चांगली संधी आहे. ग्रोवचा बिझनेस मॉडेल मजबूत असून, भारतातील डिजिटल गुंतवणुकीची वाढ त्याला आणखी उंचीवर घेऊन जाऊ शकते.

वाचा - SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Groww shares hit lower circuit after 94% return; investors sell.

Web Summary : Groww's shares plummeted after a 94% surge post-listing, triggering profit booking. Analysts attribute the fall to healthy correction, high valuation compared to established firms. Experts advise partial profit booking or holding with a stop-loss.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकनिर्देशांकनिफ्टी