Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतून आली "गुड न्यूज", रॉकेट बनले भारताचे संरक्षण क्षेत्रातील शेअर्स...! खरेदीसाठी लोकांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:48 IST

कोचीन शिपयार्ड शिवाय, आज, डेटा पॅटर्न, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, मिधानी सारख्या इतर संरक्षण संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्येही ३% ते ६% ची वाढ दिसून आली...

ऑपरेशन सिंदूर नंतर, भारतातील संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स रॉकेट बनले आहेत. हे शेअर्स सातत्याने फोकसमध्ये आहेत. आज, गुरुवार ५ जून रोजी, पुन्हा एकदा संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून आली. संरक्षण कंपनी कोचीन शिपयार्डच्या शेअर्समध्ये १३% पर्यंत वाढ झाली. कंपनीच्या शेअर्समध्ये सलग तिसऱ्या दिवशी वाढ दिसून आली. गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये हा शेअर २०% ने वधारला आहे. कोचीन शिपयार्ड शिवाय, आज, डेटा पॅटर्न, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, मिधानी सारख्या इतर संरक्षण संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्येही ३% ते ६% ची वाढ दिसून आली.

शेअरमधील तेजीचे कारण - अमेरिकेशी संबंधित एका बातमीनंतर संरक्षण क्षेत्राशी संबंधित शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. खरे तर, अमेरिकन डिफेन्स सेक्रेटरी पीट हेगसेथ यांनी, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची नाटो मेंबर्सकडे आपल्या संरक्षण खर्चात मोठी वाढ करण्याची मागणी पुन्हा एकदा उचलली आहे. हेगच्या आगामी नाटो शिखर परिषदेपूर्वी बोलताना हेगसेथ म्हणाले, सहकाऱ्यांनी ट्रंम्प यांच्या गत मागणीवर गांभीर्याने विचार करायला हवा की, प्रत्येक सदस्याने संरक्षणावर जीडीपीच्या ५% गुंतवणूक करावी, जी सध्याच्या नाटो मार्गदर्शक तत्त्वाच्या २% पेक्षा दुप्पट आहे. महत्वाचे म्हणजे, ट्रम्प यांनी यापूर्वी नाटो सहकारी देशांवर त्यांच्या आर्थिक वचनबद्धतेची पूर्तता न केल्याबद्दल टीका केली होती. तसेच, वाढत्या जागतिक धोक्यांमुळे २% लक्ष्य अपुरे असल्याचे म्हटले होते. यावर, आघाडी आधीच आपल्या खर्चाच्या लक्ष्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याचा विचार करत आहे, अशी पुष्टी नाटोचे महासचिव मार्क रूट यांनी केली होती 

रुट यांनी प्रस्ताव दिला आहे की,  सदस्य देशांनी त्यांचा संरक्षण खर्च जीडीपीच्या ३.५% पर्यंत वाढवावा, तसेच सुरक्षे-संबंधित व्यापक गुंतवणुकीसाठी अतिरिक्त १.५% वचनबद्ध करावे. यात सायबर संरक्षण, पायाभूत सुविधा संरक्षण आणि हायब्रिड धोक्यांचा सामना, आदींचा समावेश असू शकतो. तसेच "ही नवीन संरक्षण गुंतवणूक योजना नाटो शिखर परिषदेत चर्चेच्या केंद्रस्थानी असेल," असेही रुट यांनी म्हटले होते.

टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजारशेअर बाजार