Gold Trading : जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत होणारा प्रचंड चढ-उतार हा नैसर्गिक नसून तो चीनमधील सट्टेबाजीमुळे होत असल्याचा खळबळजनक दावा अमेरिकेचे कोषागार सचिव स्कॉट बेसेंट यांनी केला आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले की, चीनमधील ट्रेडर्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी तिथल्या अटी कडक केल्या जात आहेत, परिणामी सोन्याच्या किमतीत 'क्लासिकल बबल' सारखी स्थिती निर्माण झाली आहे.
चीनमध्ये परिस्थिती हाताबाहेरबेसेंट यांच्या मते, गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत झालेली मोठी पडझड ही चीनमधील अस्थिरतेचा परिणाम आहे. चीनमध्ये सोन्याच्या व्यापारासाठी 'मार्जिन'च्या अटी कडक कराव्या लागत आहेत, कारण तिथले ट्रेडर्स मोठ्या प्रमाणावर सट्टेबाजी करत आहेत. "सोन्यातील ही उसळी केवळ सट्टेबाजीवर आधारीत आहे," असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
अमेरिकन बाजारात 'अच्छे दिन'सोन्यातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन डॉलरने जानेवारीनंतर प्रथमच साप्ताहिक झेप घेतली आहे. विशेष म्हणजे, अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक डाऊ जोन्सने इतिहासात पहिल्यांदाच ५०,००० अंकांचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. बेसेंट यांनी या विक्रमाचे स्वागत करत म्हटले की, "ही अमेरिकन कॉर्पोरेट क्षेत्राच्या वाढत्या ताकदीची आणि गुंतवणूकदारांच्या विश्वासाची पावती आहे."
फेडरल रिझर्व्ह आणि 'केविन वार्श' यांच्यावर भाष्यअमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेच्या आगामी धोरणांवर बोलताना बेसेंट म्हणाले, की फेडरल रिझर्व्ह आपल्या बॅलन्स शीटमध्ये कपात करण्यापूर्वी किमान एक वर्ष विचार करेल. ते कोणताही निर्णय घाईघाईने घेणार नाहीत. ट्रम्प यांनी 'फेड'च्या अध्यक्षपदासाठी नामांकित केलेले केविन वार्श हे स्वतंत्रपणे काम करतील. मात्र, ते अमेरिकन जनतेप्रती उत्तरदायी असतील.
व्याजदर कपातीवरून निर्माण झालेला वादमुलाखतीदरम्यान बेसेंट यांनी ट्रम्प आणि केविन वार्श यांच्यातील संबंधांवरही स्पष्टीकरण दिले. "जर वार्श यांनी ट्रम्प यांच्या इच्छेनुसार व्याजदर कमी केले नाहीत, तर त्यांच्यावर खटला भरावा लागेल," असे विधान बेसेंट यांनी आधी केले होते. मात्र, सिनेटच्या चौकशीत त्यांनी स्पष्ट केले की, "तो केवळ एक विनोद होता." ट्रम्प यांची इच्छा आहे की 'फेड'चा अध्यक्ष त्यांच्या धोरणांशी सुसंगत असावा, पण वार्श यांची योग्यता वादातीत आहे.
Web Summary : US Treasury Secretary claims China's speculation drives gold price volatility. He cites strict margin rules causing a 'classical bubble.' Dollar gains, Dow Jones hits 50,000. Fed to consider balance sheet cuts; Trump's Fed nominee, Kevin Warsh, will be independent.
Web Summary : अमेरिकी कोषागार सचिव का दावा, चीन की सट्टेबाजी से सोने की कीमतों में अस्थिरता। सख्त मार्जिन नियमों से 'क्लासिकल बबल' बन रहा है। डॉलर में उछाल, डाउ जोंस 50,000 पर। फेड बैलेंस शीट कटौती पर विचार करेगा; ट्रम्प के नामांकित केविन वार्श स्वतंत्र होंगे।