Godfrey Phillips Shares : तंबाखूजन्य पदार्थांवर केंद्र सरकारने लावलेल्या वाढीव अबकारी करामुळेसिगारेटच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. मात्र, या दरवाढीचा फटका बसण्याऐवजी सिगारेट उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. सिगारेट बनवणारी दिग्गज कंपनी गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड या कंपनीचा शेअर आज गुरुवारी ६ टक्क्यांहून अधिक वधारला असून, गेल्या तीन दिवसांत या शेअरने तब्बल ३१ टक्क्यांची कमाई करून दिली आहे.
शेअर्समध्ये तेजीचे सत्र का?१ फेब्रुवारी २०२६ पासून सरकारने सिगारेट, बिडी आणि पान मसाल्यावरील करात मोठी वाढ केली आहे. यानंतर कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे रिसर्च हेड विनोद नायर यांच्या मते, सिगारेट कंपन्यांकडे जबरदस्त 'प्राइसिंग पॉवर' आहे. म्हणजे कर वाढला तरी या कंपन्या त्याचा भार ग्राहकांवर टाकून आपला नफा सुरक्षित ठेवू शकतात. किमती वाढल्यामुळे सुरुवातीला विक्रीच्या प्रमाणावर काहीसा परिणाम होऊ शकतो. मात्र, सिगारेटची मागणी ही 'स्ट्रक्चरल' असल्याने कंपन्यांची कमाई दीर्घकाळात स्थिर राहते.
किती महागली सिगारेट?सरकारने १ फेब्रुवारीपासून 'सिन गुड्स'वरील जीएसटी दर २८ टक्क्यांवरून थेट ४० टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. जीएसटी सोबतच अतिरिक्त अबकारी करही लागू करण्यात आला आहे. या नव्या कररचनेमुळे प्रत्येक सिगारेटच्या किमतीत साधारणपणे २ ते ११ रुपयांची वाढ झाली आहे. पान मसाला, गुटखा आणि सुगंधी तंबाखू देखील महागले आहेत.
वाचा - रॉबर्ट कियोसाकींचा धक्कादायक इशारा! शेअर बाजार कोसळणार, पण हुशार गुंतवणूकदार होणार 'करोडपती'
बाजारपेठेतील स्थितीआज सकाळी १०.२८ च्या सुमारास 'गॉडफ्रे फिलिप्स'चा शेअर बीएसईवर १.७९ टक्क्यांच्या वाढीसह २,५२४.१० रुपयांवर व्यवहार करत होता. तत्पूर्वी, व्यवहारादरम्यान या शेअरने २,६३५.१५ रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला होता. डिसेंबर तिमाहीचे निकाल पाहता, कंपन्यांची नफा कमवण्याची क्षमता अजूनही मजबूत असल्याचे दिसून येत आहे.
Web Summary : Increased taxes on tobacco haven't hurt cigarette stocks. Godfrey Phillips shares surged, gaining 31% in three days. Companies pass tax burden to consumers, maintaining profits due to steady demand.
Web Summary : तंबाकू पर कर बढ़ने के बावजूद सिगरेट शेयरों में तेजी है। गॉडफ्रे फिलिप्स के शेयर तीन दिनों में 31% बढ़े। कंपनियां कर का बोझ उपभोक्ताओं पर डालती हैं, जिससे स्थिर मांग के कारण लाभ बना रहता है।