GNG Electronics IPO: ग्रे मार्केटमध्ये खळबळ उडवून देणारा हा आयपीओ जीएनजी इलेक्ट्रॉनिक्स (GNG Electronics IPO) आज प्रायमरी मार्केटमध्ये दाखल झालाय. आजपासून म्हणजेच २३ जुलैपासून हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला असून तो २५ जुलै रोजी बंद होईल. ग्रे मार्केटमध्ये नोंदवलेल्या प्रीमियम (IPO GMP) मुळे हा IPO चर्चेचा विषय बनला आहे.
२३ जुलै रोजी ग्रे मार्केटमध्ये त्याचा जीएमपी १०५ रुपयांवर होता. या आयपीओमधून गुंतवणूकदारांना ४४.३० टक्के नफा होण्याचे संकेत ग्रे मार्केट प्रीमिअममधून मिळत आहेत. नफ्याबद्दल अधिक बोलण्यापूर्वी, या आयपीओबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
मुकेश अंबानींच्या रिलायन्सविरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
GNG Electronics IPO महत्त्वाची माहिती
प्राईज बँड - २२५ रुपये ते २३७ रुपयेलॉट साइज- ६३ शेअर्सकिमान गुंतवणूक - १४,९३१
या आयपीओचा (GNG Electronics IPO Price Band) प्राईज बँड २२४ ते २३७ रुपये आहे. हे खरेदी करण्यासाठी ६३ शेअर्सचा (GNG Electronics IPO Price Band) किमान एक लॉट घ्यावा लागेल. याचा अर्थ असा की एकूण १४,९३१ रुपये गुंतवावे लागतील. तर किरकोळ गुंतवणूकदार त्यात जास्तीत जास्त २ लाख रुपये गुंतवू शकतात.
कंपनी कोणतं काम करते?
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ही कंपनी रिटेल आणि कॉर्पोरेट दोन्ही सेवा पुरवते. ते बहुतेकदा त्यांच्या ग्राहकांना रिफर्बिश्ड लॅपटॉप आणि डेस्कटॉप पुरवते. कंपनीचे उद्दिष्ट तंत्रज्ञान सुलभ, परवडणारं आणि दर्जेदार बनवण्याचं आहे.
(टीप- यामध्ये केवळ सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)