Join us

अदानींना अमेरिकेची साथ, 'या' कामासाठी मिळणार मोठी रक्कम; शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 15:06 IST

अमेरिकेच्या या निर्णयामुळे चीनला मोठा धक्का बसणार आहे.

Gautam Adani: भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी मोठी बातमी आली आहे. ही बातमी अदानी समूहाने श्रीलंकेत सुरू केलेल्या बंदर प्रकल्पाबाबत आहे. या प्रकल्पासाठी अमेरिकेने अदानी समूहाला 553 मिलियन डॉलर्स, म्हणजेच सूमारे 4600 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या वृत्तामुळे चीनला मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेच्या श्रीलंकेतील प्रवेशामुळे चीनच्या मनमानी कारभाराला आळा बसेल. दुसरीकडे अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या अदानी पोर्टचे शेअर्स 2 टक्क्यांहून अधिक वाढीसह व्यवहार करत आहेत. ही गुंतवणूक अशा वेळी होत आहे, जेव्हा अमेरिकन बँका गौतम अदानींना पाठिंबा देण्यास तयार नाहीत. अदानींना मध्यपूर्वेवर अवलंबून राहावे लागत आहे. शिवाय, हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूह आणि गौतम अदानी यांना चांगलाच फटका बसला होता. बँका आणि गुंतवणूकदारांच्या विश्वासालाही मोठा तडा गेला होता. आता या बातमीमुळे गौतम अदानी आणि अदानी समूहावर अमेरिकन आणि युरोपीयन बँकांसह गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल. 

अमेरिकन एजन्सी 4600 कोटी देणार आहेअदानी समूह श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये डीप वॉटर वेस्ट कंटेनर टर्मिनल बांधत आहे. यामध्ये अमेरिकेची एजन्सी इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन 4600 कोटी रुपयांचा निधी देणार आहे. या अमेरिकन सरकारी संस्थेची आशियातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी गुंतवणूक मानली जात आहे. यामुळे श्रीलंकेचा आर्थिक विकास होईल आणि दोन्ही देशांचा प्रमुख भागीदार असलेल्या भारतासह त्याच्या प्रादेशिक आर्थिक एकात्मतेला चालना मिळेल, असे DFC ने एका निवेदनात म्हटले आहे.

चीनचे वर्चस्व संपणारकोलंबो बंदर हे हिंदी महासागरातील सर्वात व्यस्त बंदरांपैकी एक आहे, कारण ते आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गांच्या जवळ आहे. सर्व कंटेनर जहाजांपैकी जवळजवळ निम्मी जहाजे त्यांच्या पाण्यातून जातात. चीनने श्रीलंकेत सुमारे 2.2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. चीन हा श्रीलंकेतील सर्वात मोठा थेट विदेशी गुंतवणूकदार आहे. या कारणास्तव अमेरिकन सरकारने चीनचे वर्चस्व संपवण्यासाठी येथे गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. 

अदानी पोर्टचे शेअर्स वाढलेया वृत्तानंतर अदानी पोर्टच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. आज कंपनीचे शेअर्स 802 रुपयांवर उघडले. तर, दुपारी 12:42 वाजता कंपनीचे शेअर्स 2.43 टक्क्यांच्या वाढीसह 816.55 रुपयांवर व्यवहार करत होते. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 1,76,386 कोटी रुपये आहे. दुपारी 3:00 वाजेपर्यंत कंपनीचे शेअर 817.85 रुपयांवर व्यवहार करत आहेत.

 

टॅग्स :गौतम अदानीव्यवसायगुंतवणूकअदानीअमेरिकाश्रीलंका