Join us
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी गुंतवणूकदारांची माघार सुरूच! डिसेंबरमध्ये १७,९५५ कोटींची शेअर्स विक्री; वर्षभरात १.६ लाख कोटी काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 16:44 IST

Foreign Investors : भारतीय शेअर बाजाराकडे विदेश संस्थात्मक गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र वर्षभरात पाहायला मिळाले. यापाठीमागे अनेक कारणे आहेत.

Foreign Investors : विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारातील विक्री डिसेंबर महिन्यातही तीव्र झाली आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या १२ दिवसांतच भारतीय इक्विटी बाजारातून तब्बल १७,९५५ कोटी (सुमारे २ बिलियन डॉलर) रुपये किमतीचे शेअर्स विकून पैसे काढून घेतले आहेत. या मोठ्या माघारीमुळे, संपूर्ण २०२५ या वर्षात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून काढलेली एकूण रक्कम १.६ लाख कोटी (सुमारे १८.४ बिलियन डॉलर) वर पोहोचली आहे. नोव्हेंबरमध्ये ३,७६५ कोटी रुपयांची विक्री झाल्यानंतर, ही वेगवान विक्री भारतीय शेअर बाजारांवर दबाव वाढवत आहे.

सततच्या विक्रीचे सत्रऑक्टोबर महिन्यात १४,६१० कोटी रुपयांची शुद्ध गुंतवणूक करून विदेशी गुंतवणूकदारांनी तीन महिन्यांचे विक्रीचे सत्र खंडित केले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा विक्री सुरू झाली आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात एफपीआयने ३४,९९० कोटी, सप्टेंबरमध्ये २३,८८५ कोटी रुपये आणि जुलैमध्ये १७,७०० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली होती. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या आकडेवारीनुसार, १ ते १२ डिसेंबर दरम्यान एफपीआयने १७,९५५ कोटी रुपये काढले आहेत.

विदेशी गुंतवणूकदार पैसे का काढत आहेत?

  • विकसित बाजारांना प्राधान्य : मॉर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंट रिसर्च इंडियाचे प्रिन्सिपल मॅनेजर रिसर्च, हिमांशू श्रीवास्तव यांच्या मते, अमेरिकेत वाढलेले व्याजदर, कमी झालेली लिक्विडिटी आणि सुरक्षित किंवा जास्त रिटर्न देणाऱ्या विकसित बाजारपेठेतील ॲसेट्सना गुंतवणूकदार प्राधान्य देत आहेत.
  • भारताचे उच्च मूल्याकन : भारताचे शेअरचे मूल्यांकन इतर उदयोन्मुख बाजारांच्या तुलनेत जास्त झाले आहे, ज्यामुळे भारत सध्या कमी आकर्षक ठरत आहे, तर इतर उदयोन्मुख बाजारपेठा चांगली व्हॅल्यू देत आहेत.
  • रुपयाचे अवमूल्यन: भारतीय रुपयातील तीव्र घसरण हे देखील विदेशी विक्रीचे एक प्रमुख कारण आहे.
  • एंजेल वनचे वरिष्ठ फंडामेंटल ॲनालिस्ट वकार जावेद खान यांनी जागतिक पोर्टफोलिओ पुनर्संतुलन, वर्षाच्या अखेरीचा परिणाम आणि सातत्याने टिकून राहिलेली मॅक्रोइकोनॉमिक अनिश्चितता ही देखील या विक्रीमागील कारणे सांगितली.

वाचा - रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज

घरगुती गुंतवणूकदारांमुळे बाजाराला आधारविदेशी गुंतवणूकदारांची विक्रीची ही लाट असूनही, भारतीय बाजारपेठांवर होणारा परिणाम देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या मजबूत भागीदारीमुळे मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. डीआयआयने याच कालावधीत ३९,९६५ कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक केली, ज्यामुळे एफपीआयच्या आऊटफ्लोचा बाजारावरील परिणाम प्रभावीपणे कमी झाला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Foreign investors continue retreat, sell shares worth ₹17,955 crore.

Web Summary : Foreign investors aggressively sold Indian shares in December, withdrawing ₹17,955 crore. Year-to-date outflows reached ₹1.6 lakh crore. Attractive developed markets, high Indian valuations, and rupee depreciation are key factors. Domestic investors' support mitigated the impact.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकनिर्देशांकनिफ्टी