Join us

फिचच्या झटक्यानं शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स ६७६ अंकांनी आपटला; या शेअर्समध्ये मोठी घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 16:40 IST

बुधवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली.

फिच रेटिंग्सनं अमेरिकेचं सॉवरेन क्रेडिट रेटिंग डाऊनग्रेड केल्यानंतर जागतिक शेअर बाजारातील कमजोरीमुळे बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारातही घसरण दिसून आली. बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 676.53 अंकांच्या किंवा 1.02 टक्क्यांच्या घसरणीसह 65,782.78 अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचप्रमाणे, एनएसई निफ्टी 207.00 अंकांच्या म्हणजेच 1.05 टक्क्यांच्या घसरणीसह 19,526.55 अंकांच्या पातळीवर बंद झाला. हिरो मोटोकॉर्पचा शेअर निफ्टीमध्ये सर्वाधिक 3.49 टक्क्यांनी घसरला.

बीएसई सेन्सेक्सवर टाटा स्टील आणि टाटा मोटर्सचे शेअर्स 3 टक्क्यांहून अधिक घसरले. याशिवाय लार्सन अँड टुब्रो, भारती एअरटेल, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, पॉवरग्रीड, एचडीएफसी बँक, टायटन, आयटीसी, बजाज फायनान्स आणि इंडसइंड बँक बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, जेएसडब्ल्यू स्टील आणि एसबीआयच्या शेअर्समध्ये एका टक्क्याहून अधिक घसरण झाली.

याशिवाय विप्रो, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक, मारुती, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांचे शेअर्स 0.50 टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले.

या शेअर्समध्ये तेजीनेस्ले इंडिया, एशियन पेंट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्स एका टक्क्यांहून अधिक उसळीसह बंद झाले.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थितीआज सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह बंद झाले. ऑटो, कॅपिटल गुड्स, पीएसयू बँक, पॉवर आणि मेटल निर्देशांकात दोन टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली. त्याचप्रमाणे हेल्थकेअर, आयटी आणि ऑईल अँड गॅस निर्देशांकात एका टक्क्याहून अधिक घसरण दिसून आली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप 1.50-1.50 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

टॅग्स :शेअर बाजार