Join us

आधी FPO, आता रद्द केला बाँड विकण्याचाही प्लॅन; अदानींच्या कंपनीचा आणखी एक मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 20:53 IST

अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने एफपीओ मागे घेतल्यानंतर आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने एफपीओ मागे घेतल्यानंतर आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. अदानी एंटरप्रायझेसने आता बाँड्सच्या पहिल्या सार्वजनिक विक्रीची योजना पुढे ढकलली आहे. बाँड्सच्या सार्वजनिक विक्रीद्वारे 10 अब्ज रुपये (सुमारे 122 मिलियन डॉलर्स) उभारण्याची अदानी एंटरप्रायझेसची योजना होती. बाजारातील घसरणीनंतर अदानी एंटरप्रायझेसने हा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी ही माहिती दिली आहे.

गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने जानेवारीसाठी सार्वजनिक नोट जारी करण्याची योजना आखली होती. इश्यू साठी अदानी समूहाची कंपनी एडलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, एके कॅपिटल, जेएम फायनान्शियल आणि ट्रस्ट कॅपिटल यांच्यासोबत काम करत होती. ब्लूमबर्गने डिसेंबरमध्ये याची माहिती दिली होती. आता हे थांबवण्यात आल्याचे एका व्यक्तीने सांगितले. प्रकरण खाजगी असल्याने त्या व्यक्तीने नाव न सांगण्याची अट घातली आहे.

मार्केट कॅप कमी झालेअमेरिकन इन्व्हेस्टमेंट फर्म आणि शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने 24 जानेवारी 2023 रोजी एक रिपोर्ट समोर आणला. हा अहवाल अदानी समूहाबाबत होता. अहवालात अदानी समूहावर शेअर्समध्ये फेरफार आणि अकाउंटिंग फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहहे. हा अहवाल आल्यापासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. अहवाल येण्यापूर्वी, अदानी समूहाच्या शेअर्सचे मार्केट कॅप 16 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होते, जे शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 रोजी 10 लाख कोटी रुपयांच्या खाली आले.

टॅग्स :गौतम अदानीशेअर बाजार