Join us

पुन्हा एकदा पैसा कमावण्याची संधी! Enviro Infra Engineers IPO ला दुसऱ्या दिवशीही उदंड मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 12:16 IST

Enviro Infra Engineers IPO: जलशुद्धीकरण प्रकल्प आणि 'सिवरेज सिस्टिम'च्या प्रकल्पांमध्ये सहभागी असलेल्या एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्सच्या आयपीओला दुसऱ्या दिवशीही उदंड प्रतिसाद मिळत आहे.

Enviro Infra Engineers IPO : आयपीओच्या माध्यमातून पुन्हा एकदा पैसे कमावण्याची संधी निर्माण झाली आहे. एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्सच्या आयपीओला दुसऱ्या दिवशीही उदंड प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी कंपनीचा इश्यू पूर्णपणे सबस्क्राइब झाला होता. जलशुद्धीकरण प्रकल्प आणि 'सिवरेज सिस्टिम'च्या प्रकल्पामध्ये ही कंपनी सहभागी आहे. यानंतर सोमवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी जवळपास १३ पट सबस्क्राइब झाला आहे. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (NII) भाग सर्वाधिक बुक झाला होता. दुसऱ्या दिवसापर्यंत ३४ पेक्षा जास्त वेळा शेअर्स ऑफर केले गेले होते. किरकोळ गुंतवणूकदारांनी ८.७३ वेळा या इश्यू सबस्क्राइब  केला. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी एकूण ६५० कोटी रुपये उभारणार आहे. या IPO ची किंमत १४०-१४८ रुपये प्रति शेअर आहे. गुंतवणूकदार या इश्यूमध्ये २६ नोव्हेंबरपर्यंत पैसे गुंतवू शकतात. हा इश्यू २२ नोव्हेंबर रोजी उघडण्यात आला होता.

GMP वर काय चालले आहे?Investorgain.com च्या मते, ग्रे मार्केटमध्ये Enviro Infra Engineers चे शेअर्स ५२ रुपयांच्या प्रीमियमवर आहेत. याचा अर्थ कंपनीचे शेअर्स २०० रुपयांना लिस्ट केले जाऊ शकतात. लिस्टेडवर गुंतवणूकदारांना सुमारे ३६% नफा होऊ शकतो. कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसई या दोन्ही ठिकाणी लिस्टेड होण्यासाठी प्रस्तावित आहेत. Enviro Infra Engineers चे शेअर्स २९ नोव्हेंबर रोजी लिस्टेड होऊ शकतात.

काय आहेत तपशील?एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनियर्सने गुरुवारी अँकर म्हणजेच मोठ्या गुंतवणूकदारांकडून सुमारे १९५ कोटी रुपये उभे केले होते. कंपनीच्या IPO मध्ये ३.८७ कोटी इक्विटी शेअर्सच्या ताज्या इश्यूव्यतिरिक्त, प्रवर्तकांनी ५२.६८ लाख शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत ठेवले आहेत. सध्या, एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्समध्ये प्रवर्तकांचे ९३ टक्क्यांहून अधिक हिस्सेदारी आहेत. कंपनी सरकारी प्राधिकरण/संस्थेसाठी पाणी आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि पाणी पुरवठा योजना प्रकल्पांचे डिझाईन, बांधकाम, ऑपरेशन आणि देखभाल यात काम करते.

(Disclaimer : यामध्ये आयपीओची माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक