Join us

याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 16:00 IST

DSM Fresh Foods IPO: या कंपनीचे शेअर्स ९ ऑक्टोबर रोजी बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर १२० रुपये प्रति शेअर दराने लिस्ट झाले. हा दर आयपीओच्या १०० रुपये प्रति शेअर किंमतीपेक्षा २० टक्के जास्त आहे.

DSM Fresh Foods IPO: डीएसएम फ्रेश फूड्स लिमिटेडनं शेअर बाजारात दमदार सुरुवात केली आहे. Zappfresh ब्रँड नावानं फ्रेश मीट आणि रेडी-टू-कुक नॉनव्हेज उत्पादनं विकणाऱ्या या कंपनीचे शेअर्स ९ ऑक्टोबर रोजी बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर १२० रुपये प्रति शेअर दराने लिस्ट झाले. हा दर आयपीओच्या १०० रुपये प्रति शेअर किंमतीपेक्षा २० टक्के जास्त आहे. शेअर्सच्या या जोरदार लिस्टिंगनं ग्रे मार्केटचे अंदाजही मागे टाकले.

इन्वेस्टरगेनच्या आकडेवारीनुसार, लिस्टिंगपूर्वी कंपनीचे अनलिस्‍टेड शेअर्स आयपीओ किंमत १०० रुपये प्रति शेअरवर शून्य ग्रे मार्केट प्रीमियमवर व्यवहार करत होते. लिस्टिंगनंतर बाजारात झालेल्या जोरदार खरेदीमुळे शेअरला १२६ रुपयांचं अपर सर्किट लागलं. म्हणजेच, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना २६ टक्के इतका नफा झाला.

पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?

आयपीओला कसा प्रतिसाद मिळाला?

डीएसएम फ्रेश फूड्सनं ९५-१०० रुपये प्रति शेअर च्या प्राइस बँडवर नवीन शेअर्सद्वारे ५९ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम उभारण्यासाठी आपला आयपीओ लाँच केला होता. यासाठी गुंतवणूकदार कमीतकमी १,२०० शेअर्ससाठी बोली लावू शकत होते, ज्यासाठी प्रति लॉट १.२० लाख रुपये गुंतवणुकीची आवश्यकता होती. हा आयपीओ २६ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर पर्यंत खुला होता, ज्याला गुंतवणूकदारांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. आयपीओ एकूण १.३६ पट सबस्क्राइब झाला होता.

  • क्युआयबी (Qualified Institutional Buyers) सेगमेंटमधून १.५३ पट बोली लागली.
  • एनआयआय (Non-Institutional Investors) सेगमेंटने २.०६ पट सबस्क्रिप्शन मिळवले.
  • किरकोळ (Retail) गुंतवणूकदारांचा कोटा केवळ ०.९६ पटच सबस्क्राइब झाला.
  • कंपनीने या इश्यू अंतर्गत १० रुपये फेस व्हॅल्यू असलेले ५९,०६,४०० नवीन शेअर्स जारी केले होते. 

आयपीओतून उभारलेल्या रकमेचा वापर

आयपीओतून उभारलेल्या रकमेपैकी १०.६८ कोटी रुपये भांडवली खर्चासाठी, २५ कोटी रुपये वर्किंग कॅपिटलच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, १५ कोटी रुपये मार्केटिंग आणि प्रमोशनवर खर्च केले जातील आणि उर्वरित रक्कम कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरली जाईल. मे २०१५ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी Zappfresh नावानं ऑनलाइन फ्रेश मीट आणि रेडी-टू-कुक उत्पादनं विकते. प्ले स्टोरवर या कंपनीच्या ॲपचे १ लाखांपेक्षा जास्त डाउनलोड झाले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : DSM Fresh Foods IPO lists with 20% premium, hits upper circuit.

Web Summary : DSM Fresh Foods IPO listed at ₹120, a 20% premium. The Zappfresh brand owner's shares surged, hitting the upper circuit at ₹126. The IPO was subscribed 1.36 times, with varied interest from different investor segments. Proceeds will fund capital expenditure, working capital, and marketing.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक