Join us

Dixon Technologies Share : २२००० रुपयांपार जाऊ शकतो 'हा' मल्टीबॅगर शेअर, वर्षभरात झालीये १९१ टक्क्यांची वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 16:14 IST

Dixon Technologies Share Price : कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाशी संबंधित कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात १९१ टक्के वाढ झाली आहे. पाहा कोणता आहे हा शेअर.

Dixon Technology Share Price : कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाशी संबंधित डिक्सन टेक्नॉलॉजीज या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात १९१ टक्के वाढ झाली आहे. शुक्रवारी बीएसईवर कंपनीचा शेअर १८४०६ रुपयांवर पोहोचला. डिक्सन टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये आणखी तेजी दिसू शकते, असं बाजार तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कंपनीचे शेअर्स २२,००० रुपयांच्या पुढे जाऊ शकतात, असं त्यांनी म्हटलंय. डिक्सन टेक्नॉलॉजीजच्या शेअरची ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर १९,१४९.८० रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ५७५८ रुपये आहे.

काय म्हटलंय ब्रोकरेजनं?

ग्लोबल ब्रोकरेज हाऊस नोमुरानं डिक्सन टेक्नॉलॉजीजचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. नोमुरानं कंपनीच्या शेअर्सवर 'बाय' रेटिंग कायम ठेवलंय. इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस (ईएमएस) सेगमेंटमध्ये डिक्सन टेक्नॉलॉजीज ही नोमुराची अव्वल पसंती कायम आहे. डिक्सन टेक्नॉलॉजीजचा शेअर २२,२५६ रुपयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच कंपनीच्या शेअर्समध्ये २४ टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळू शकते, असं ब्रोकरेजचं म्हणणं आहे. ब्रोकरेज हाऊस नोमुरानं यापूर्वी कंपनीच्या शेअर्ससाठी १८,६५४ रुपयांचं टार्गेट ठेवलं होतं. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये डिक्सन टेक्नॉलॉजीजचा महसूल ६१ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाजही नोमुरानं व्यक्त केलाय.

५ वर्षांत २२००% ची वाढ

डिक्सन टेक्नॉलॉजीजच्या शेअरमध्ये गेल्या ५ वर्षात २२२० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. ३ जानेवारी २०२० रोजी कंपनीचा शेअर ७९०.१४ रुपयांवर होता. ३ जानेवारी २०२५ रोजी कंपनीचा शेअर १८,५८१.६५ रुपयांवर पोहोचला. गेल्या दोन वर्षांत डिक्सन टेक्नॉलॉजीजचा शेअर ३८५ टक्क्यांनी वधारला आहे. तर गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये १९१% वाढ झाली आहे. डिक्सन टेक्नॉलॉजीजचा शेअर ३ जानेवारी २०२४ रोजी ६३४९.३० रुपयांवर व्यवहार करत होता. कंपनीचा शेअर ३ जानेवारी २०२५ रोजी १८५८१.६५ रुपयांवर पोहोचला आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक