Join us

१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 21:41 IST

कंपनीने जून 2025 ला संपलेल्या पहिल्या तिमाहीसाठी 280.02 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे. जो गेल्या वर्षाच्या याच तिमाहीच्या 139.70 कोटी रुपयांच्या तुलनेत वार्षिक आधारावर 100% आहे.

डिक्सन टेक्नोलॉजीजने (Dixon Technologies) आज मंगळवारी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे परिणाम जाहीर केले. जून तिमाहीत कंपनीला जबरदस्त नफा झाला आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 100% पर्यंत वाढला आहे. कंपनीने जून 2025 ला संपलेल्या पहिल्या तिमाहीसाठी 280.02 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे. जो गेल्या वर्षाच्या याच तिमाहीच्या 139.70 कोटी रुपयांच्या तुलनेत वार्षिक आधारावर 100% आहे.

इतर डिटेल्स - जून तिमाहीत व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीचे उत्पन्न (EBITDA) ४८४ कोटी रुपये होते, जे गेल्या वर्षीच्या २५६ कोटी रुपयांच्या तुलनेत ८९% अधिक आहे. कंपनीचे निव्वळ कर्ज जून २०२५ च्या अखेरीस २१४ कोटी रुपयांपर्यंत वाढले. हे मार्च २०२५ पर्यंत ६२ कोटी रुपयांचे होते. या तिमाहीत डिक्सनचे करोत्तर प्रॉफिट मार्जिन २.२% एवढे होते. जे गेल्या वर्षाच्या याच तिमाहीत 2.1% च्या तुलनेत 10 आधार अंकांची वृद्धी दर्शवते.

अशी आहे शेअरची स्थिती -कंपनीचा शेअर बीएसईवर उत्पन्नाची घोषणा होण्यापूर्वी, १% ने घसरून १६,११२.२० रुपयांवर बंद झाला होता. आता बुधवारी हा शेअर फोकसमध्ये राहू शकतो. २०२५ मध्ये आतापर्यंत या शेअरमध्ये ४.७% वाढ झाली आहे तर गेल्या सहा महिन्यांत ७.६% वाढ दिसून आली आहे. कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी किंमत १९,१४९.८० रुपये आहे तर ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत १०,६१३ रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप ९७,४८१.८९ कोटी रुपये एवढे आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकशेअर बाजार