Share Market Holiday 2025: या वर्षी दिवाळीची नेमकी तारीख २० ऑक्टोबर आहे की २१ ऑक्टोबर, याबाबत थोडा गोंधळ होता. काही ठिकाणी दिवाळी २० ऑक्टोबरला साजरी केली जात आहे, तर काही ठिकाणी २१ ऑक्टोबरला. आता हे स्पष्ट झालंय आहे की या वर्षी दिवाळी २० ऑक्टोबरला साजरी केली जाईल. कार्तिक महिन्याची अमावस्या याच दिवशी आहे. या निमित्तानं, भारतातील बहुतेक भागांमध्ये २० ऑक्टोबर रोजी शाळा, कॉलेज, बँका आणि सरकारी कार्यालयं बंद राहतील.
परंतु, ट्रेडर्ससाठी एक गोष्ट निश्चित आहे की २१ ऑक्टोबर रोजी दिवाळी लक्ष्मी पूजनामुळे भारतीय शेअर बाजार (NSE आणि BSE) बंद राहतील. महाराष्ट्रात दिवाळीची मुख्य सुट्टी २१ ऑक्टोबरला असेल. म्हणजेच त्या दिवशी तेथे शाळा, कॉलेज, बँका आणि सरकारी कार्यालये बंद राहतील.
याचा अर्थ असा आहे की, मुंबईतील शेअर बाजार जसं की BSE आणि NSE २० ऑक्टोबरला नव्हे, तर २१ ऑक्टोबरला बंद राहतील. म्हणजे आज जिथे बहुतेक राज्ये दिवाळीची सुट्टी साजरी करतील, तिथे शेअर बाजारात ट्रेडिंग होईल.
NSE चं नोटिफिकेशन काय सांगतं?
NSE नं आपल्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरमध्ये लिहिलंय की, २१ ऑक्टोबर (मंगळवार) रोजी लक्ष्मी पूजनामुळे बाजार बंद राहील. या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग होईल, जो एक विशेष ट्रेडिंग सेशन असतो, जो दिवाळी आणि नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला होतो. यानंतरच्या दिवशी म्हणजेच २२ ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदाची सुट्टी असेल, या दिवशीही ट्रेडिंग होणार नाही. विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकात या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. या सुट्ट्यांमुळे शेअर बाजारात दिवाळीच्या काळात एक ब्रेक मिळेल.
मुहूर्त ट्रेडिंगची वेळ २०२५
या वर्षी NSE आणि BSE नुसार मुहूर्त ट्रेडिंग २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १:४५ वाजल्यापासून ते २:४५ वाजेपर्यंत होईल. हे फक्त १ तासाचं एक विशेष ट्रेडिंग सेशन असतं, जे शुभ मानलं जातं. यासोबतच विक्रम संवत २०८२, नवीन हिंदू आर्थिक वर्ष सुरू होईल. गेल्या वर्षी मुहूर्त ट्रेडिंग १ नोव्हेंबरला संध्याकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत झालं होतं.
२०२५ मधील शेअर बाजाराच्या सुट्ट्या
२१ ऑक्टोबर (मंगळवार) – दिवाळी (लक्ष्मी पूजन)
२२ ऑक्टोबर (बुधवार) – बलिप्रतिपदा
५ नोव्हेंबर (बुधवार) – प्रकाश पर्व (गुरु नानक देव जी यांचा जन्मदिवस)
२५ डिसेंबर (गुरुवार) – ख्रिसमस
Web Summary : Indian stock markets (NSE & BSE) will be closed on October 21st, 2025, for Diwali's Lakshmi Pujan. Muhurat trading will occur that day. The market will also be closed on October 22nd for Balipratipada. Trading resumes after these holidays.
Web Summary : दिवाली के लक्ष्मी पूजन के लिए भारतीय शेयर बाजार (एनएसई और बीएसई) 21 अक्टूबर, 2025 को बंद रहेंगे। उस दिन मुहूर्त ट्रेडिंग होगी। बाजार 22 अक्टूबर को बलिप्रतिपदा के लिए भी बंद रहेगा। इन छुट्टियों के बाद कारोबार फिर से शुरू होगा।