Join us

Mutual Fund असावा तर असा! कोणताही गाजावाजा नाही, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला जबरदस्त रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 14:52 IST

Defence sector mutual funds: पाहा कोणते आहेत हे फंड्स. कोणत्या फंडानं किती दिलाय रिटर्न, जाणून घ्या...

Defence sector mutual funds: गेल्या तीन महिन्यांत संरक्षण क्षेत्रावर आधारित म्युच्युअल फंडांमध्ये ६०% पर्यंत वाढ झाली आहे. या श्रेणीतील सक्रिय आणि निष्क्रिय अशा सुमारे सहा फंडांनी याच कालावधीत सरासरी ५७.७०% परतावा दिलाय. या श्रेणीतील तीन योजनांनी ६०% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. गेल्या तीन महिन्यांत मोतीलाल ओसवाल निफ्टी इंडिया डिफेन्स ईटीएफनं सर्वाधिक ६०.४९% परतावा दिला आहे, त्यानंतर मोतीलाल ओसवाल निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंडचा क्रमांक लागतो ज्यानं याच कालावधीत ६०.२३% परतावा दिला आहे.

या फंड्सनं दिलाय उत्तम रिटर्न

याच कालावधीत ग्रो निफ्टी इंडिया डिफेन्स ईटीएफ आणि आदित्य बिर्ला एसएल निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंडनं अनुक्रमे ६०.१२% आणि ५९.९६% परतावा दिला. या कालावधीत ग्रो निफ्टी इंडिया डिफेन्स ईटीएफ एफओएफनं ५९.४५% परतावा दिला. संरक्षण क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारा एकमेव अॅक्टिव्ह फंड असलेल्या एचडीएफसी डिफेन्स फंडनं या कालावधीत ४५.९३% परतावा दिला. विश्लेषकांच्या मते, या वाढीचं श्रेय क्षेत्रीय कम्पोनंट्सनं मिळवलेली मजबूत कमाई, भारत सरकारनं वाढलेल्या भांडवल वाटपासह धोरणात्मक गती आणि सीमांवर अलिकडच्या भारत-पाकिस्तान संघर्षात भारताच्या संरक्षण क्षमतेच्या प्रत्यक्ष वापराच्या प्रकरणातून आलेले ट्रिगर्स यांना जातं.

परदेशी विद्यार्थी गेले तर अमेरिकेची अर्थव्यवस्था.., रघुराम राजन यांचा डोनाल्ड ट्रम्पना इशारा

६ महिन्यांचा रिटर्न काय?

गेल्या सहा महिन्यांत, संरक्षण-आधारित निष्क्रिय फंडांनी ३४% परतावा दिला आहे, ज्यामध्ये मोतीलाल ओसवाल निफ्टी इंडिया डिफेन्स ईटीएफनं यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे, कारण या फंडानं गेल्या सहा महिन्यांत ३४.२२% परतावा दिलाय, त्यानंतर मोतीलाल ओसवाल निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंडचा क्रमांक लागतो ज्यानं त्याच कालावधीत ३३.७३% परतावा दिला आहे. ग्रो निफ्टी इंडिया डिफेन्स ईटीएफ एफओएफनं गेल्या सहा महिन्यांत ३३.३५% परतावा दिला आहे. या क्षेत्रावर आधारित एकमेव सक्रिय फंड असलेल्या एचडीएफसी डिफेन्स फंडनं त्याच कालावधीत १५.८६% परतावा दिलाय.

(टीप- यामध्ये केवळ म्युच्युअल फंडांच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक