Join us

फक्त १२ दिवसांत ४२,७४२ कोटी रुपयांचा नफा! 'या' स्टॉकने एका झटक्यात CEO चे नशीब बदलले, पण कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 10:39 IST

CoreWeave Stock : शेअर बाजारात एका स्टॉकने अवघ्या १२ दिवसांत कंपनीच्या सीईओला मालामाल केलं आहे. या शेअरमध्ये अवघ्या २ महिन्यात तब्बल ३०० टक्के वाढ झाली आहे.

Multibagger Stock: शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक अविश्वसनीय बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या 'कोरवीव्ह' (CoreWeave) नावाच्या एका एआय क्लाउड स्टार्टअपच्या शेअरने चमत्कार केला आहे. अवघ्या दोन महिन्यांत या स्टॉकने ३०० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवून आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

२ महिन्यांत ३००% वाढ आणि सीईओची संपत्ती दुप्पटकाही महिन्यांपूर्वी हा स्टॉक फक्त ४० डॉलर प्रति शेअर दराने बाजारात आला होता, पण नंतर तो ३३.५२ डॉलरपर्यंत कोसळला. मात्र, गेल्या दोन महिन्यांत त्याने अचानक रॉकेटच्या वेगाने वाढ नोंदवली आणि १८७ डॉलरवर पोहोचला. यामुळे गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळाला आहे.

या स्टॉकच्या वाढीचा सर्वात मोठा फायदा कंपनीचे सीईओ मायकेल इंट्रेटर यांना झाला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, गेल्या १२ दिवसांत त्यांची संपत्ती ५ अब्ज डॉलरवरून १० अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे. भारतीय रुपयांमध्ये सांगायचे झाल्यास, मायकेल इंट्रेटर यांनी फक्त १२ दिवसांत ४२,७४२ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. त्यांच्यासोबतच, सह-संस्थापक ब्रायन व्हेंचुरो आणि ब्रायन मॅकबी हे देखील अब्जाधीश बनले आहेत.

एआय कंपन्यांसोबतच्या करारामुळे स्टॉकला मिळाली गतीकोअरवीव्हच्या स्टॉकला ही रॉकेट गती मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे मायक्रोसॉफ्ट, ओपन एआय आणि एनव्हीडिया यांसारख्या एआय क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांसोबत झालेले मोठे करार. या करारांमुळे गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास वाढला आणि शेअरच्या किमतीत प्रचंड वाढ झाली.

वाचा - Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा

सुरुवातीला किंमत कोसळली असली तरी, सीईओ मायकेल इंट्रेटर यांना त्यांच्या बिझनेस मॉडेलवर पूर्ण विश्वास होता. त्यांचा विश्वास अल्पावधीतच खरा ठरला आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूकअमेरिका