Join us

सलग ८८ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ₹१ लाखाचे झाले ₹२,६०,०००; तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

By जयदीप दाभोळकर | Updated: October 22, 2025 14:04 IST

Multibagger Stock: शेअर बाजारात कधी कोणता शेअर तुम्हाला श्रीमंत करेल आणि कधी बुडवेल, हे सांगता येत नाही. बाजारात गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या अस्थिरतेतही काही शेअर्सनी 'मल्टीबॅगर रिटर्न' दिला आहे.

Multibagger Stock: शेअर बाजारात कधी कोणता शेअर तुम्हाला श्रीमंत करेल आणि कधी बुडवेल, हे सांगता येत नाही. बाजारात गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या अस्थिरतेतही काही शेअर्सनी 'मल्टीबॅगर रिटर्न' दिला आहे आणि त्यांचा वेग अजूनही मंदावलेला नाही. असाच एक मल्टीबॅगर शेअर आहे, कोलॅब प्लॅटफॉर्म्सचा शेअर. हा स्टॉक सलग ८८ ट्रेडिंग सत्रांपासून 'अपर सर्किट' हिट करत आहे. काल, म्हणजेच २१ ऑक्टोबरला, मुहूर्त ट्रेडिंगमध्ये या स्टॉकनं अपर सर्किटला स्पर्श केला आणि १६४.८० रुपयांवर बंद झाला. एका वर्षापूर्वी या शेअरची किंमत फक्त ६.२९ रुपये होती. त्यावेळी जर एखाद्या गुंतवणूकदारानं या मल्टीबॅगर 'पेनी स्टॉक'मध्ये पैसे लावले असते, तर आज त्याला तुफान नफा झाला असता.

कोलॅब प्लॅटफॉर्म्सनं नुकतीच घोषणा केली होती की ते अमेरिकेत 'कोलाब इंटेलिजन्स' नावाची १००% मालकीची उपकंपनी स्थापन करण्याची योजना आखत आहेत. ते AI क्षेत्रात विस्तार करण्यासाठी हे करत आहेत. या घोषणेनंतर कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांचा विश्वास आणखी मजबूत झाला आहे.

'या' शेअरमध्ये १८ महिन्यांत ६३०००% ची तेजी; आता BSE नं वाजवली धोक्याची घंटा, क्रिकेटरचंही जोडलेलं नाव

दीर्घकाळात तुफान परतावा

भारतात लिस्टिंग झाल्यापासून एप्रिल २०२१ पासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना १४,७२५% पेक्षा अधिक परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात कोलॅब प्लॅटफॉर्म्सच्या शेअरमध्ये २,५२०% ची तेजी राहिली आहे. २०२५ च्या सुरुवातीपासून आतापर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये ९६६% ची वाढ नोंदवली गेली आहे, आणि गेल्या एका महिन्यात हा ४८% नं वाढला आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्येही हा शेअर १०% वर ट्रेड करत आहे. एनएसईवर या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १६४.८० रुपये आहे. २८ ऑक्टोबर २०२४ रोजी ५२-आठवड्यांची नीचांकी पातळी ₹५.६९ होती.

एक लाखांचे झाले २६ लाख

कोलॅब प्लॅटफॉर्म्सच्या शेअरने वर्षभरातच २५२० टक्के परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. जर वर्षभरापूर्वी एखाद्या गुंतवणूकदारानं या मल्टीबॅगर शेअरमध्ये एक लाख रुपये लावले असते आणि आतापर्यंत ती गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आज त्याच्या गुंतवणुकीचं मूल्य वाढून २,६२०,०३१ रुपये झालं असते. कोलॅब प्लॅटफॉर्म्सचा शेअर गुंतवणूकदारांसाठी जबरदस्त नफा देणारा ठरला आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Multibagger Stock: ₹1 Lakh to ₹26 Lakhs in a Year!

Web Summary : Colab Platforms stock hits upper circuit for 88 days, delivering 2520% returns in a year. A ₹1 lakh investment would now be ₹26 lakhs. The company is expanding into AI with a US subsidiary.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा