Join us

सरकारी कंपनीच्या स्टॉकचा शेअर बाजारात 'जलवा', वर्षभरात पैसे केले दुप्पट; काय म्हणाले एक्सपर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 15:56 IST

कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर दिसून आली आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर वाढ झाली आहे.

PSU Stocks: कोल इंडिया (Coal India Share Price) या सरकारी कंपनीच्या शेअरच्या किमतीत मंगळवारी कामकाजादरम्यान 5.80 टक्क्यांची वाढ झाली होती. या वाढीनंतर कंपनीच्या शेअर्सची किंमत 457.85 रुपयांवर पोहोचली. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर दिसून आली आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर वाढ झाली आहे.किती झाली कमाई? 

कोल इंडिया लिमिटेडचा (CIL) निव्वळ नफा डिसेंबरमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 16.9 टक्क्यांनी वाढून 9,069.19 कोटी रुपये झाला आहे. कंपनीने शेअर बाजारांना ही माहिती दिली. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 7,755.55 कोटी रुपये होता. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीचा एकत्रित महसूल वाढून 36,153.97 कोटी रुपये झाला आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 35,169.33 कोटी रुपये होता. 

काय म्हणतात तज्ज्ञ? 

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म सेंट्रमचा विश्वास आहे की कंपनीचे शेअर्स 458 रुपयांच्या पातळीपर्यंत जाऊ शकतात. त्यांनी या शेअरला ‘ADD’ रेटिंग दिलं आहे. त्याचवेळी कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजनं शेअर्स विकण्याचा सल्ला दिला आहे. शेअर 335 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो, असा या ब्रोकरेज फर्मचा विश्वास आहे. 

कशी होती कामगिरी? 

गेल्या एका महिन्यात कोल इंडियाच्या शेअरच्या किमती 17 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. त्याच वेळी, ज्या गुंतवणूकदारांनी 6 महिन्यांपासून स्टॉक ठेवला आहे, त्यांनी आतापर्यंत 92 टक्के नफा कमावला आहे. एका वर्षापासून शेअर्स होल्ड करणाऱ्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत 112 टक्के नफा झाला आहे. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील ब्रोकरेजची आणि तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारसरकारशेअर बाजार