Join us

Closing Bell : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांना १ लाख कोटींचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 16:33 IST

गुरुवारी कामकाजाच्या अखेरच्या सत्रात शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला.

गुरुवारी कामकाजाच्या अखेरच्या सत्रात शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्समध्ये 542 अंकांची तर निफ्टी 19,400 अंकांपर्यंत घसरला. दरम्यान, मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये काही प्रमाणात खरेदी झाली, ज्यामुळे बाजाराला काही प्रमाणात आधार मिळाला. फार्मा आणि युटिलिटी सेक्टर वगळता इतर सर्व शेअर निर्देशांक घसरणीसह बंद झाले. रियल्टी, बँकिंग आणि मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. यामुळे आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचं सुमारे 1.01 लाख कोटी रुपयांचे नुकसान झालं.

कामकाजाच्या अखेरच्या सत्रात बीएसईवरील (BSE) 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 542.10 अंकांनी किंवा 0.82 टक्क्यांनी घसरून 65,240.68 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 144.90 अंकांनी किंवा 0.74 टक्क्यांनी घसरून 19,381.65 वर बंद झाला.

1.01 लाख कोटी बुडालेबीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 3 ऑगस्ट रोजी 302.32 लाख कोटी रुपयांवर घसरलं. आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच बुधवार, 2 ऑगस्ट रोजी 303.33 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.01 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.01 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

या शेअर्समध्ये घसरणटायटनच्या शेअरमध्ये सर्वाधिक 2.40 टक्क्यांनी घसरण झाली. यानंतर बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, नेस्ले इंडिया आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आणि जवळपास ते 1.78 टक्के ते 2.29 टक्क्यांपर्यंत घसरले.

टॅग्स :शेअर बाजार