Join us

Closing Bell: सेन्सेक्स ३८५ अकांनी वधारला, निफ्टी १९७०० पार; कोल इंडिया-L&T वधारला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 16:20 IST

गेल्या चार दिवसांपासून सुरू शेअर बाजारात सुरू असलेली वाढ आजही कायम होती.

Stock market closing result Today : गेल्या चार दिवसांपासून सुरू शेअर बाजारात सुरू असलेली वाढ आजही कायम होती. सेन्सेक्स 369 अंकांनी वधारून बंद झाला, तर निफ्टीनं 19700 चा टप्पा पार केला. सकाळच्या टप्प्यात शेअर बाजाराची सुरुवात थोडी धीमी झाली. दरम्यान, गुरुवारी कोल इंडियाचे शेअर्स 7 टक्के आणि L&T 4 टक्क्यांनी मजबूत होऊन बंद झाले. 

कमकुवत जागतिक बाजारपेठा आणि विदेशी फंडचा आऊट फ्लो पाहता, देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात घसरले. परंतु दुपारनंतर यात वाढ झाली आणि बाजार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स 368.91 अंकांनी किंवा 0.56 टक्क्यांनी मजबूत होऊन 66,249.43 च्या पातळीवर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टी-50 मध्ये 111.95 म्हणजेच 0.57 टक्क्यांची वाढ नोंदवली आणि तो 19,723.00 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

हे शेअर्स वधारलेकोचीन शिपयार्डच्या शेअरमध्ये सर्वाधिक 20 टक्क्यांची उसळी नोंदवली गेली आणि शेअरनं 1146 रुपयांचा भाव ओलांडला. त्याचप्रमाणे आशी इंडिया ग्लास 8 टक्के, कोल इंडिया 7 टक्के, त्याचप्रमाणे KIOCL लिमिटेडमध्ये 6 टक्के आणि KRBL लि. शेअर 5.93 टक्क्यांनी वाढला. सेन्सेक्स पॅकचा L&T चा शेअर्स 4 टक्क्यांनी वाढले, इंडसइंड बँक, एसबीआय, टेक महिंद्रा, एचसीएल आणि पॉवरग्रिड, एनटीपीसीचे शेअर्स 1 टक्क्यांपेक्षा अधिक वाढले.

या शेअर्समध्ये घसरणगुजरात स्टेट फर्टिलायझर्स मध्ये सर्वाधिक 7.30 टक्क्यांची घसरण झाली. यात एपीएल अपोलो ट्यूब्स 3.53 टक्क्यांनी घसरले आणि रेटगेन ट्रॅव्हल, फॉस इंडिया, जिंदाल शॉ यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स पॅकमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फायनान्स, नेस्ले, अल्ट्राटेक सिमेंट, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस यांच्या शेअर्समध्येही घसरण झाली.

टॅग्स :शेअर बाजार