Join us

Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 16:09 IST

शेअर बाजार चालू आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी घसरणीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स ४५ अंकांनी घसरून ७३४६६ अंकांवर बंद झाला.

Closing Bell Today:  शेअर बाजार चालू आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी घसरणीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स ४५ अंकांनी घसरून ७३४६६ अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५० निर्देशांक कोणताही बदल न होता २२३०२ अंकांवर बंद झाला. बुधवारी निफ्टीनं २२३८६ अंकांची उच्चांकी आणि २२१८५ ची नीचांकी पातळी पाहिली. शेअर बाजाराच्या कामकाजात निफ्टी मिडकॅप १०० आणि बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकांनी तेजी घेतली, तर निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक घसरून बंद झाले. 

बुधवारी शेअर बाजाराच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात चढ-उतार झाले आहेत. सकाळी कमजोरीनं कामाला सुरुवात झाल्यानंतर काही काळ बाजारात तेजी दिसून आली होती. मात्र पुन्हा त्यानंतर घसरण झाली. हीरो मोटोकॉर्पनं गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर हीरो मोटोकॉर्पच्या शेअरमध्ये बंपर वाढ पाहायला मिळाली आहे. 

मल्टीबॅगर स्टॉक्सची स्थिती 

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना अल्प आणि दीर्घ मुदतीत मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांबद्दल बोलायचं झालं तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, लार्सन, ओएनजीसी, बीएसई लिमिटेड आणि कोटक महिंद्रा बँकेचं शेअर्स तेजीसह बंद झाले, तर टीसीएस, विप्रो, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक आणि एशियन पेंट्सचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. 

शेअर बाजारात लिस्टेड गौतम अदानी समूहाच्या १० पैकी ४ कंपन्यांचे शेअर्स बुधवारी घसरणीसह बंद झाले, तर ६ कंपन्यांचे शेअर्स वधारले. अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स सुमारे चार टक्क्यांनी वधारले, तर अदानी पोर्ट्सच्या शेअरमध्ये एका टक्क्याची घसरण दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजार