Join us

Closing Bell : सेन्सेक्स ७२ हजारांपार, निफ्टी २१७१० अंकांवर बंद; बँकिंग शेअर्समध्ये घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 16:16 IST

नवीन कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजारात वाढ दिसून आली.

नवीन कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजारात वाढ दिसून आली. बीएसई सेन्सेक्स 72000 ची पातळी गाठण्यात यशस्वी झाला आणि सुमारे 178 अंकांच्या वाढीसह 72026 च्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी जवळपास 50 अंकांच्या वाढीसह 21708 च्या पातळीवर बंद झाला.शुक्रवारी शेअर बाजाराच्या व्यवहारात बरेच चढ-उतार नोंदवले गेले. दिवसाच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 72484 चा उच्चांकावर पोहोचला होता आणि तो 71,816 च्या नीचांकी पातळीवरही आला होता. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीने शुक्रवारी 21630 ही नीचांकी पातळी तर 21744 ही उच्च पातळी पाहिली. शुक्रवारी निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटीनं वाढ नोंदवली तर निफ्टी बँक निर्देशांक घसरणीसह काम करत होते.

कामकाजादरम्यान, अदानी पोर्ट्स, टीसीएस, एलएनटी आणि एलटीआय माइंड ट्रीचे शेअर्स वाढीसह बंद झाले तर ब्रिटानिया, यूपीएल, नेस्ले आणि जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

अदांनींच्या ६ शेअर्समध्ये घसरणशुक्रवारी गौतम अदानी समूहाच्या नऊ लिस्टेड कंपन्यांपैकी तीन कंपन्यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले तर सहा शेअर्स घसरणीसह बंद झाले. अदानी टोटल गॅसमध्ये सर्वाधिक सर्वाधिक 2.34 टक्क्यांची घसरण झाली, तर अदानी पोर्ट्समध्ये 2.65 टक्क्यांची सर्वाधिक वाढ झाली.

टॅग्स :शेअर बाजार