Join us

Closing Bell: शेअर बाजाराची चांगली रिकव्हरी, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 16:16 IST

मोठ्या चढ-उतारानंतर देशांतर्गत शेअर बाजार आज वाढीसह बंद झाले.

मोठ्या चढ-उतारानंतर देशांतर्गत शेअर बाजार आज वाढीसह बंद झाले. बीएसई सेन्सेक्स 149.31 अंकांच्या म्हणजेच 0.23 टक्क्यांच्या वाढीसह 65,995.81 अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचप्रमाणे, NSE निफ्टी 61.70 अंकांच्या म्हणजेच 0.32 टक्क्यांच्या वाढीसह 19,632.55 अंकांच्या पातळीवर बंद झाला. आज, डॉ. रेड्डीजच्या शेअरमध्ये निफ्टीवर सर्वाधिक 3.92 टक्क्यांची वाढ दिसून आली. त्याचप्रमाणे जेएसडब्ल्यू स्टीलचा शेअर 3.20 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

सेक्टर्सबद्दल बोलायचं झालं तर मेटल इंडेक्स 2.3 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. त्याचप्रमाणे ऑईल अँड गॅस निर्देशांकात एका टक्क्यानं वाढ झाली. एफएमसीजी, कॅपिटल गुड्स, हेल्थकेअर निर्देशांक 0.5-0.5 टक्क्यांनी वाढले. मात्र, रिअल इस्टेट निर्देशांकात 1.3 टक्क्यांची घसरण दिसून आली. बँक निर्देशांकात 0.2 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. बीएसई मिडकॅप निर्देशांकात 0.4 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांकात 0.5 टक्क्यांची उसळी दिसून आली.

या शेअर्समध्ये वाढ  (Top Gainers at Sensex)जेएसडब्ल्यू स्टीलचा शेअर्स सेन्सेक्सवर सर्वाधिक 2.68 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. टाटा मोटर्सचे शेअर्स 2.57 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 2.35 टक्के, टाटा स्टील 1.74 टक्के, टायटन 1.44 टक्के, आयटीसी 1.36 टक्के, टेक महिंद्रा 1.26 टक्क्यांनी वाढून बंद झाले. याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, लार्सन अँड टुब्रो, सन फार्मा, इन्फोसिस आणि एचसीएल टेक यांचे शेअर्सही वाढीसह बंद झाले.

या शेअर्समध्ये घसरण (Top Losers at Sensex)बजाज फायनान्स, मारुती, आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रीड, एशियन पेंट्स, अॅक्सिस बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, भारती एअरटेल, नेस्ले इंडिया, टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये आज घसरण दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजार