City Pulse Multiventures :शेअर बाजारात 'मल्टिबॅगर' कोणाला म्हणतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'सिटी पल्स मल्टिव्हेंचर्स'. मनोरंजन विश्वातील या कंपनीने गेल्या ५ वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः कोट्यधीश बनवले आहे. ५ वर्षांपूर्वी केवळ ९ रुपयांना मिळणारा हा शेअर आज २,८५३ रुपयांवर पोहोचला आहे. हा प्रवास एखाद्या चित्रपट कथेपेक्षा कमी नाही, पण यामध्ये गुंतवणुकीची जोखीमही तितकीच मोठी आहे.
गुंतवणुकीचे गणित: १ लाख गुंतवले असते तर...
- जर एखाद्या गुंतवणूकदाराने ५ वर्षांपूर्वी या कंपनीत १ लाख रुपये गुंतवले असते आणि ते आजपर्यंत कायम ठेवले असते, तर त्या रकमेचे मूल्य आज ३ कोटी १७ लाख रुपये झाले असते.
- ५ वर्षांतील परतावा: ३१,६०५%
- १ वर्षातील परतावा: १३३%
- सध्याचा भाव: २,८५३ रुपये (कालच्या सत्रात किंचित घसरण).
'WOW' सिनेमॅटिक प्रवास: पारंपारिक ते डिजिटलसाल २००० मध्ये सुरू झालेली ही कंपनी गुजरातमध्ये 'WOW Cine Pulse' या ब्रँडखाली मल्टिप्लेक्स आणि मिनीप्लेक्स चालवते. आता ही कंपनी पारंपारिक सिनेमा हॉलसोबतच 'WOWPLEX' या स्वतःच्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून डिजिटल विश्वातही पाऊल टाकत आहे.
शेअरहोल्डिंग पॅटर्नTrendlyne च्या आकडेवारीनुसार, या कंपनीची मालकी संरचना थोडी वेगळी आहे.
- प्रमोटर हिस्सा : केवळ १२% (गेल्या तीन तिमाहीपासून स्थिर).
- सार्वजनिक गुंतवणूक : ८८%
- FII आणि म्युच्युअल फंड: या बड्या गुंतवणूकदारांचा हिस्सा 'शून्य' आहे.
- तज्ज्ञांच्या मते, संस्थागत गुंतवणूकदारांची अनुपस्थिती ही धोक्याची घंटा असू शकते, कारण यामुळे शेअरमध्ये मोठी अस्थिरता निर्माण होण्याचा धोका असतो.
आर्थिक स्थिती आणि व्हॅल्युएशनकंपनीची आर्थिक आकडेवारी संमिश्र चित्र उभे करते.
- मार्केट कॅप : ३,०२८ कोटी रुपये.
- PE Ratio: २,२५२.३ (उद्योगाच्या सरासरीपेक्षा खूपच जास्त, म्हणजे शेअर प्रचंड महाग आहे).
- ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन : ८१.३% (हे अतिशय मजबूत आहे).
- ROE आणि ROA: अनुक्रमे १.५% आणि १.४% (हे उद्योगाच्या सरासरीपेक्षा कमी आहेत).
- ताजी कामगिरी : डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल २५% वाढून १.४८ कोटी रुपयांवर गेला, तर नफा ७०% वाढीसह ०.७५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
पैसा छापायची मशीन की 'हाय रिस्क' गेम?
सिटी पल्सने गेल्या ५ वर्षांत पैसा छापण्याचे काम केले असले तरी, प्रमोटर्सचा कमी हिस्सा आणि प्रचंड महागडे व्हॅल्युएशन यामुळे हा शेअर 'हाय रिस्क' श्रेणीत येतो. नवीन गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
वाचा - PF व्याजाचा निर्णय पक्का! २०२५-२६ साठी व्याजदर ठरला; केंद्राची मंजुरी मिळताच खात्यात पैसे जमा होणार
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : City Pulse Multiventures gave 31,000% return in 5 years turning ₹1 lakh into ₹3 crore. High risk due to low promoter holding. OTT platform entry adds potential.
Web Summary : सिटी पल्स मल्टीवेंचर्स ने 5 वर्षों में 31,000% रिटर्न दिया, ₹1 लाख को ₹3 करोड़ में बदला। कम प्रमोटर होल्डिंग के कारण उच्च जोखिम। ओटीटी प्लेटफॉर्म में प्रवेश से संभावना बढ़ी।