Ather Energy IPO: जर तुम्ही एथर एनर्जी आयपीओमध्ये बोली लावली असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. एथर एनर्जी आयपीओमधील शेअर्सचं वाटप अंतिम झालं आहे. ज्या गुंतवणूकदारांना शेअर्सचं वाटप करण्यात आलं आहे त्यांचे शेअर्स डिमॅट खात्यात जमा केले जातील. ज्यांना शेअर्सचं वाटप झालं नाही त्यांच्या परताव्याची प्रक्रियाही आज पूर्ण होणार आहे. एथर एनर्जी आयपीओचं लिस्टिंग ६ मे रोजी होणार आहे. २८ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत कंपनीचा आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला होता. आपण आपले शेअर अलॉटमेंट स्टेटस ऑनलाइन तपासू शकता.
एथर एनर्जीच्या आयपीओला किरकोळ गुंतवणूकदारांकडून १.७८ पट सब्सक्रिप्शन मिळालं. पात्र संस्थात्मक खरेदीदारांनी (क्यूआयबी) १.७० पट आणि बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एनआयआय) ६६ टक्के सब्सक्राइब केलं. कर्मचाऱ्यांच्या श्रेणीत ५.४३ पट सबस्क्रिप्शन मिळालं. निविदेच्या शेवटच्या दिवशी एथर एनर्जीआयपीओचं सब्सक्रिप्शन स्टेटस १.४३ पट होते.
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
NSEच्या वेबसाइटवर कसं तपासावं
एनएसईच्या आयपीओ अलॉटमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस पेजला भेट द्या.त्यानंतर Equity & SME IPO bid details ला सिलेक्ट करासिलेक्ट सिंबलमध्ये Ather सिलेक्ट कराआता येथे पॅन नंबर आणि अॅप्लिकेशन नंबर टाका.त्यानंतर सबमिटवर क्लिक करा, तुमचे स्टेटस तुमच्यासमोर असेल.
बीएसई वेबसाइटवर कसं तपासाल?
स्टेप १: मुंबई स्टॉक एक्स्चेंजच्या (बीएसई) अधिकृत वेबसाइटच्या स्टेटस चेक पेजला भेट द्या.स्टेप २ : 'इन्व्हेस्टर' सेक्शनमध्ये जा.स्टेप ३: 'Investor Services' मेनूमधून 'Status of Issue Application' निवडा.स्टेप ४: 'Application Status Check' ऑप्शनवर क्लिक करा.स्टेप ५: इश्यू टाईप फील्डमध्ये, इक्विटी निवडा.स्टेप ६: इश्यूच्या नावासह आवश्यक माहिती मिळवा.स्टेप ७: तुमचा पॅन नंबर टाका आणि तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी सर्चवर क्लिक करा.
जीएमपीचे काय संकेत?
एथर एनर्जी आयपीओ आज जीएमपी किंवा ग्रे मार्केट प्रीमियम +७ आहे. InvestGain.com नुसार, ग्रे मार्केटमध्ये एथर एनर्जीच्या शेअरची किंमत ७ रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत होती. आयपीओ प्राइस बँडच्या अपर लेव्हलला आणि ग्रे मार्केटमधील सध्याच्या प्रीमियमवर आधारित एथर एनर्जी शेअरची अंदाजित लिस्टिंग किंमत ३२८ रुपये प्रति शेअर आहे. ३२१ रुपयांच्या आयपीओ किंमतीपेक्षा हे २.१८% जास्त आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)