Join us

कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 12:33 IST

Stock Crash : तिमाही निकाल समोर आल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. या कंपनीत कॅनरा बँकेची गुंतवणूक आहे.

Stock Crash : गेल्या आठवड्यापासून शेअर बाजारात चांगली घोडदौड सुरू आहे. असे असतानाही काही कंपन्यांचे शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. कॅनरा रोबेको ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या शेअर्समध्ये आज, मंगळवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात मोठी घसरण पाहायला मिळाली. कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच कंपनीच्या शेअर्सची किंमत ११% पर्यंत खाली आली. बाजार बंद झाल्यानंतर सोमवारी कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले होते, जे अपेक्षेप्रमाणे नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये निराशा दिसून आली.

तिमाही निकालांमध्ये मोठी घसरण

  • कॅनरा रोबेको एएमसीच्या प्रमुख आर्थिक निर्देशकांमध्ये तिमाही निकालात मोठी घट नोंदवली गेली
  • कंपनीच्या महसुलात तिमाही आधारावर ११% ची घसरण झाली असून, तो १०७.७ कोटी रुपयांपर्यंत खाली आला.
  • जून तिमाहीच्या तुलनेत EBITDA (व्याज, कर, घसारा आणि ॲमॉर्टायझेशनपूर्वीची कमाई) मध्ये १७% ची मोठी घट झाली.
  • कंपनीचा EBITDA मार्जिन ४४० बेसिस पॉइंटने घसरला आणि जून तिमाहीतील ६८% वरून ६३% वर आला.
  • वाढत्या खर्चांमुळे कंपनीचा निव्वळ नफा तिमाही-दर-तिमाही २०% ने कमी झाला.

नवीन स्कीम्सची घोषणानिकालांमध्ये घट झाली असली तरी, कॅनरा रोबेको एएमसीने बाजारात दोन नवीन योजना लॉन्च करण्याची योजना जाहीर केली आहे.कॅनरा रोबेको इनोव्हेशन फंडकॅनरा रोबेको बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस फंडया स्कीम्सचे लॉन्चिंग भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ किंवा इतर नियामकांच्या मंजुरी आणि अनुकूल बाजार परिस्थितीवर अवलंबून असेल.

शेअर बाजारातील स्थितीआजच्या सुरुवातीच्या व्यवहारात, कॅनरा रोबेको एएमसीचे शेअर्स १०.५% नी घसरून ३१३.९५ रुपयांवर व्यवहार करत होते. कमजोर तिमाही निकालानंतर नफावसुलीमुळे ही विक्री झाल्याचे दिसून आले.

वाचा - सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?

कंपनीची पार्श्वभूमीकॅनरा रोबेको एएमसीची स्थापना १९९३ मध्ये झाली होती. ही कंपनी कॅनरा बँक आणि ओरिक्स कॉर्पोरेशन युरोप N.V. यांच्यातील एक संयुक्त उपक्रम आहे, जो २००७ मध्ये स्थापित झाला. जून तिमाहीच्या अखेरीस, कंपनीच्या एकूण ॲसेट अंडर मॅनेजमेंटची रक्कम १.१७ लाख कोटी रुपये होती, ज्या काळात कंपनीचा महसूल १२१.३ कोटी रुपये आणि निव्वळ नफा ६१ कोटी रुपये होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Canara Bank-backed company's shares plummet; net profit declines by 20%

Web Summary : Canara Robeco AMC shares fell sharply after disappointing Q2 results. Revenue declined 11%, EBITDA fell 17%, and net profit dropped 20%. Despite this, two new fund schemes are planned. Shares traded at ₹313.95, down 10.5%.
टॅग्स :स्टॉक मार्केटशेअर बाजार