Join us

₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 14:53 IST

C2C Advanced Systems IPO: जर तुम्ही इनिशिअल पब्लिक ऑफरिंग अर्थात आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या आठवड्यात आणखी एक आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होत आहे.

C2C Advanced Systems IPO: जर तुम्ही इनिशिअल पब्लिक ऑफरिंग अर्थात आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या आठवड्यात आणखी एक आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. हा आयपीओ डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स सोल्यूशन्स प्रोव्हायडर सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्सचा (C2C Advanced Systems IPO) आहे. हा आयपीओ २२ नोव्हेंबरला सब्सक्रिप्शनसाठी खुला होईल आणि गुंतवणूकदारांना २६ नोव्हेंबरपर्यंत यात गुंतवणूक करता येणार आहे. आयपीओसाठी २१४ ते २२६ रुपये प्रति शेअर असा प्राइस बँड निश्चित करण्यात आलाय.

हा ९९ कोटी रुपयांचा आयपीओ आहे, ज्यात कंपनीनं केवळ ४३.८३ लाख इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू समाविष्ट केला आहे. कंपनीच्या आयपीओचा अर्धा भाग क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्ससाठी, ३५ टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित १५ टक्के नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्ससाठी राखीव ठेवण्यात आलाय. कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये आधीच २२० रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहेत. म्हणजेच लिस्टिंगवर ९८ टक्के नफा होऊ शकतो.

कंपनीचा व्यवसाय काय?

कंपनी प्रोसेसर, पॉवर, रेडिओ फ्रिक्वेन्सी (आरएफ), रडार आणि मायक्रोवेव्ह, एम्बेडेड सॉफ्टवेअर आणि फर्मवेअर सह स्ट्रॅटेजिक डिफेन्स सोल्यूशन्सच्या संपूर्ण स्पेक्ट्रमसाठी डिझाइन प्रदान करते. केवळ लिस्टेड युनिट पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीजशी स्पर्धा करणाऱ्या सीटूसीची सप्टेंबर २०२४ पर्यंत ५०.५६ कोटी रुपयांची ऑर्डर बुक आहे. मार्क कॉर्पोरेट अॅडव्हायझर्स आणि बीलिन कॅपिटल अॅडव्हायझर्स यांना या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आलंय, तर त्याचे इक्विटी शेअर्स २९ नोव्हेंबर रोजी एनएसई इमर्जवर एन्ट्री करतील.

आर्थिक स्थिती कशी?

गेल्या काही वर्षांत कंपनीची आर्थिक कामगिरी मजबूत होती आणि आर्थिक वर्ष २०२४ मध्ये नफा वाढून १२.३ कोटी रुपये झाला, जो मागील वर्षीच्या २.९ कोटी रुपयांच्या तुलनेत अधिक आहे. याच कालावधीत महसूल आर्थिक वर्ष २०१३ मधील ८.०५ कोटी रुपयांवरून अनेक पटींनी वाढून ४१.०६ कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष २०१५ च्या एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत कंपनीला ४३.२ कोटी रुपयांच्या महसुलावर ९.७ कोटी रुपयांचा नफा झाला होता.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

 

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार