Join us

BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 14:24 IST

BSE Share Price: मुंबई शेअर बाजार (BSE) १ लाख कोटी रुपये किंवा त्याहून अधिक बाजार भांडवल असलेल्या निवडक कंपन्यांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

BSE Share Price: मुंबई शेअर बाजार (BSE) १ लाख कोटी रुपये किंवा त्याहून अधिक बाजार भांडवल असलेल्या निवडक कंपन्यांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. आशियातील सर्वात मोठ्या आणि सर्वात जुन्या स्टॉक एक्सचेंजचं मार्केट कॅप बुधवारी इंट्रा-डे ट्रेडमध्ये प्रथमच १ लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचलं. राष्ट्रीय शेअर बाजारवर (NSE) बीएसईच्या शेअरची किंमत ७,४२२.५० रुपयांच्या नवीन विक्रमी पातळीवर पोहोचली.

बुधवारी एनएसईवर बीएसई लिमिटेडचा शेअर १.५ टक्क्यांनी वधारून ७,४२२.५० रुपयांवर पोहोचला. गेल्या ३ ट्रेडिंग दिवसांमध्ये कंपनीच्या शेअरमध्ये १३% वाढ झाली आहे. बोनस शेअरच्या घोषणेनंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली.२३ मे २०२५ ही बोनस शेअर्ससाठी रेकॉर्ड डेट आहे.

१ महिन्यात ३१ टक्के तेजी

गेल्या महिन्यात बीएसईनं निफ्टी ५० च्या ६% तुलनेत ३१% वाढ दर्शविली. मार्च २०२४ मध्ये ३,६८२ रुपयांच्या नीचांकी पातळीवरून हा शेअर १०२ टक्क्यांनी वधारला आहे. तर २३ जुलै २०२४ रोजी २,११५ रुपयांच्या २ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून शेअर २५१ टक्क्यांनी वधारलाय.

लाभांश आणि बोनस इश्यू

बीएसईनं भागधारकांना प्रति शेअर २३ रुपये अंतिम लाभांश जाहीर केला आहे. यासाठी १४ मे ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. यात ५ रुपयांचा 'स्पेशल डिव्हिडंड' (बीएसईची १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल) आणि १८ रुपयांचा नियमित लाभांश यांचा समावेश आहे. २३ मे २०२५ ही १:२ या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करण्याची रेकॉर्ड डेट आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक