Join us

ब्रोकरेज 'या' शेअर्सवर बुलिश, २०२५ साठी सांगितले १० बेस्ट स्टॉक्स; ICICI, Zomato सह 'यांचा' समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 10:41 IST

Share Market Top 10 Stocks 2025 : पुढील वर्षात म्हणजेच २०२५ मध्ये शेअर बाजाराची कामगिरी कशी असेल, असा प्रश्न मनात येतो. तर याला प्रतिसाद म्हणून अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी २०२५ मध्ये बाजाराची वाटचाल कशी असेल याचा अंदाज वर्तवला आहे. ब्रोकरेज या १० स्टॉक्सवर बुलिश दिसून येत आहे.

Share Market Top 10 Stocks 2025 : २०२४ हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. २०२४ या वर्षात शेअर बाजारात अनेक घडामोडी घडल्या आहेत. कामगिरीच्या बाबतीत बेंचमार्क निर्देशांक निफ्टी ५० नं २०२४ मध्ये एकूण १३ टक्क्यांचा परतावा दिला आहे.

आता आपण नव्या वर्षात प्रवेश करणार आहोत, तेव्हा पुढील वर्षात म्हणजेच २०२५ मध्ये शेअर बाजाराची कामगिरी कशी असेल, असा प्रश्न मनात येतो. तर याला प्रतिसाद म्हणून अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी २०२५ मध्ये बाजाराची वाटचाल कशी असेल याचा अंदाज वर्तवला आहे. त्यावर ब्रोकरेजनं आपला दृष्टिकोन मांडला आहे. दरम्यान, देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने पुढील वर्षासाठी म्हणजेच २०२५ साठी आपला दृष्टीकोन सादर केला आहे.

ब्रोकरेज कंपनी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचा असा विश्वास आहे की, २०२५ चे पहिले ६ महिने बाजारासाठी कन्सोलिडेशनवाले असू शकतात. त्याचबरोबर पुढील ६ महिन्यांत बाजारात सुधारणा होताना दिसू शकते. मोतीलाल ओसवाल यांच्या मते, जागतिक आणि देशांतर्गत आघाडीवरील आर्थिक घडामोडींमुळे २०२५ मध्ये भारतीय बाजारांवर परिणाम होऊ शकतो.

या १० शेअर्सची केली निवड

१. आयसीआयसीआय बँके२. एचसीएल टेक्नॉलॉजीज३. लार्सन अँड टुब्रो४. झोमॅटो५. निप्पॉन लाइफ इंडिया अॅसेट मॅनेजमेंट६. मॅनकाइंड फार्मा७. लेमन ट्री८. पॉलीकॅब९. मॅक्रोटेक डेव्हलपर्स१०. सिरमा एसजीएस

दरम्यान, २०२५ च्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकार बजेट सादर करणार आहे. ते शेअर बाजारासाठी महत्त्वाचं मानलं जात आहे.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक