Join us

अवघ्या ₹36 चा शेअर ₹100 पर्यंत जाणार; गुंतवणूकदार तुटून पडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 17:29 IST

Bridge Securities Ltd Share : सध्या कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे.

Bridge Securities Ltd Share : फायनान्स क्षेत्रातील मायक्रो कॅप कंपनी, ब्रिज सिक्युरिटीजचे (Bridge Securities Ltd) शेअर्स येत्या काही दिवसांत फोकसमध्ये येतील. शुक्रवारी कंपनीचा शेअर 5% ने वाढून 36.51 रुपयांवर बंद झाला. दरम्यान, अलीकडेच कंपनीच्या बोर्ड सदस्यांनी 1:10 च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिटसाठी तारीख जाहीर केली. कंपनीने यासाठी 10 जुलै तारीख निश्चित केली आहे. यानंतर, शुक्रवारी शेअर 36.51 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला.  

तिमाही निकाल31 मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचे निव्वळ उत्पन्न 0.32 कोटी रुपये होते. तर, निव्वळ खर्च Q4FY24 मध्ये 0.02 कोटी आणि Q4FY23 मध्ये 0.84 कोटी रुपये होता. ब्रिज सिक्युरिटीजने सांगितले की, मार्च 2024 तिमाहीत त्यांचा EBIT 0.31 कोटींवर पोहोचला, तर आर्थिक वर्ष 2023 मध्ये -0.5) कोटी होता. याशिवाय, Q4FY24 मध्ये शुद्ध नफा 0.27 कोटी रुपये होता, तर Q4FY23 मध्ये 0.40 कोटी रुपयांचे नुकसान झाले. 

जाणकार काय सांगतात?सेबी रजिस्टर्ड अॅनालिस्ट वीएलए अंबाला यांच्यानुसार, येत्या 2 ते 8 महिन्यात हा शेअर 45 ते 100 रुपयांवर जाऊ शकतो. तर, 25 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा. दरम्यान, कंपनीचे मार्केट कॅप 11 कोटींपेक्षा कमी असून, कंपनी स्मॉल कॅप कॅटेगरीत येते. विशेष म्हणजे, कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या पाच दिवसांत 22% आणि महिन्याभरात 55% वाढ झाली आहे. तर, मागील सहा महिन्यात हा शेअर 103% वधारला आहे.

(टीप- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक